विधान परिषद निवडणूक पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

नागपूर, दि. 16 : नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. आतापर्यंत 14 इच्छूकांनी 17 अर्जाची उचल केली आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-2021 अंतर्गत स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. 16 नोव्हेंबरला या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा पहिला दिवस होता. नामनिर्देशनची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर आहे. दिनांक 24 नोव्हेंबरला दाखल अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर आहे. तर मतदानाचा दिवस 10 डिसेंबर असा आहे. मतमोजणी 14 डिसेंबरला होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अमोल(गुड्डू) खोरगडे यांची वाहतूक सेलच्या अध्यक्षपदी निवड

Wed Nov 17 , 2021
सावनेर – नागपूर जिल्हा युवक काँग्रेस वाहतूक सेलच्या अध्यक्षपदी बहुचर्चित अमोल ( गुड्डू) खोरगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल सीरिया यांनी अमोल( गुड्डू) खोरगडे यांना नियुक्तीपत्र दिले. अमोल खोरगडे हे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस चे सक्रिय कार्यकर्ते असून काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यक्रमात व आंदोलनात सक्रिय होते. आपल्या नियुक्ती निमित्त अमोल (गुड्डू) खोरगडे यांनी महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!