– नागपूर ग्रामीण पोलीसांची कामगिरी
नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील स्टाफ हे अवैध्य धदयावर रेड करणेकरीता पोस्टे खापरखेडा परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन गोपनीय माहिती मिळाली की, तंदुळवणी शिवारात अभिषेक मारुती मोहोळ, वय २९ वर्ष, रा. पाटनसावंगी त. सावनेर हा मोहाफुल सडव्याची साठवणुक करून मोहाफूल दारू काढतो अशा मिळालेल्या माहितीवरून मिळालेल्या माहितीची शाहानीशा करून तंदुळवणी शिवारात येथे रेड केली असता मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारा आरोपी नामे अभिषेक मारुती मोहोळ, वय २९ वर्ष, रा. पाटणसावांगी त. सावनेर हा मोहाफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आला. आरोपीचे ताब्यातून १) ६५० लिटर मोहाफुल रसायन सडवा एकूण किंमती १३०००/-रू. २) १५ लीटर मोहाफुल गावठी दारू एकूण कौ, ७५०/-रू. ३) २६ प्लास्टिक इम, ३०००/-रु. ४) इतर दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण २०,२५०/-रू. चा मुद्देमाल मिळून आल्याने नष्ट करण्यात आला. जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे खापरखेडा यांचे ताब्यात देवून आरोपी विरुद्ध पो. स्टे खापरखेडा येथे कलम ६५ (b) (c) (e) (f) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक कॉक्रेटवार, पोलीस हवालदार राजू रेवतकर, किशोर वानखेडे, आशिष मुंगळे यांनी पार पाडली.