राजधानीत संत चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी

नवी दिल्ली :- महान संत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक संत चक्रधर स्वामी यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी संत चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून स्वामींना आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत चक्रधर स्वामी यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून स्वामींना आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणेश मंडपात गरज तिथे अर्थिंग द्या !, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महावितरणची सूचना

Thu Sep 5 , 2024
नागपूर :- राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून, बहुतांशी गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती मंडपात दाखल होत आहेत. मंडळांकडून मंडपासह लगतच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जातआहे. मात्र, सर्व गणेशोत्सव मंडळांनी विद्युत उपकरणांच्या सुरक्षेवर भर द्यावा. जिथे गरज आहे; तिथे अर्थिग द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. गणेशोत्सवात तात्पुरत्या स्वरूपात विद्युत संचमांडणी करताना विद्युतभार वाढ, घट, फेरबदल विद्युत पुरवठादार कंपन्यांच्या लेखी परवानगीशिवाय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com