पोस्टे बोरी हद्दीतील धवडपेठ पारधी बेडा येथे अवैधरित्या मोहफुल गावठी दारू काढणाऱ्या इसमांवर कायदेशिर कार्यवाही

बोरी :- आगामी गटग्रामपंचायत निवडणुक या अनुषंगाने कोणतेही अनुचित प्रकार घडु नये या करीता सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने दि. ०२/११/२०२३ रोजी चे १४.३० वा. चे दरम्यान धवडपेठ पारधी बेडा येथे मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू काढणारे एकुण ५ महिला आरोपी हे मोहफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आले. आरोपीचे ताब्यातून एकुण मोहाफुल रसायण सडवा ५६२० लिटर किंमती १,१२४००/- व मोहाकुल गावठी दारू १७० लिटर किंमती ८५००/- रु व दारु गाळण्याचे साहीत्य लोखंडी ड्रम, जळाऊ लाकुड़, रबर पाईप, जर्मन चमिले, स्टील झाकणी किंमती १०,६००/-रु असा एकूण किंमती १३१५००/- रु चा मुद्देमाल मिळून आल्याने मोक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. ०५ महिला आरोपी विरुद्ध पो.स्टे बुट्टीबोरी येथे कलम ६५ (एफ) (सी), (ई), (ब) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोदार (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोस्टे बुट्टीबोरीचे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील व सोबत स्थानिक गुन्हे शाखा नाम्रा पोलीस स्टाफ सहायक फौजदार चंद्रशेखर पडेकर, सुरज परमार, महेश जाधव, पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, संजय वान्ते, गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, रोहन डाखोरे, मयुर ढेकले, किशोर वानखेडे, नितू रामटेके, कविता साखरे, पोलीस नायक निलेश इंगुलकर.. महिला पोलीस नायक बनौला शेन्डे, पोलीस अंमलदार होमेश्वर वाईलकर, चालक सुमित बागडे, आशुतोष लांजेवार तसेच पोलीस स्टेशन बुट्टीबोरी चे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर, पोलीस हवालदार प्रविण देव्हारे, तिलक रामटेके, अरविंद चव्हान, पोलीस अंमलदार पंकज ढोके, रमेश नागरे, क्रिष्णा राठोड, मपोशि स्मिता भोयर, प्रियंका निमसरकार यांचे सह संयुक्तरित्या कार्यवाही करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीला अटक

Fri Nov 3 , 2023
नरखेड :- अंतर्गत १३ कि. मी. अंतरावरील खैरगाव येथे दिनांक ०१/११/२०२३ १२.४५ वाजता दरम्यान फिर्यादी नामे- सुरज मारोतराव नारनवरे (महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण शाखा खैरगाव) वय ३० वर्ष, रा. नरखेड हा राज्य विदयुत वितरण शाखा खरगाव येथे तिन वर्षापासुन वरीष्ठ तंत्रज्ञान या पदावर कार्यरत आहे. फिर्यादीची टिम मिळुन आरोपी नामे- ज्ञानेश्वर पांडुरंग बनाईंत वय ४० वर्ष, रा. खैरगाव याने दोन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com