भारताची सार्वत्रिक निवडणूक पाहण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे जागतिक प्रतिनिधी मंडळ

– भारतीय निवडणूक स्थळ, प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणाऱ्या क्षमतेचे योगदान जगासाठी प्रचंड ‘लोकशाही अधिशेष’ निर्माण करते: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

– प्रत्येक वेळी निवडणुकीनंतर निकालांवर लोकांचा विश्वास हा भारतातील मजबूत लोकशाही प्रक्रियेची साक्ष देतो   

नवी दिल्ली :- पारदर्शकतेची संस्कृती जोपासण्यासाठी आणि लोकशाही राष्ट्रांमधील उच्च दर्जाच्या निवडणूक प्रक्रियेच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) परंपरेनुसार, 23 देशांचे प्रतिनिधित्व करणारे 75 प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमांतर्गत (आईव्हीपी) भारतीय सार्वत्रिक निवडणुका पाहण्यासाठी भारतात आले आहेत. आज नवी दिल्ली येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांच्या उपस्थितीत झाले.

भारतीय निवडणूक क्षेत्राचे योगदान आणि भारतीय निवडणूक आयोगाने केलेले कार्य हे जागतिक लोकशाही क्षेत्राचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पाहुण्यांशी संवाद साधताना नमूद केले. कायदेशीररित्या ‘लोकशाही अधिशेष’ म्हणवणाऱ्या प्रक्रिया आणि क्षमता बांधणी संदर्भात याला जगभरातील लोकशाही असलेली ठिकाणे संकुचित होण्याच्या किंवा कमी होण्याच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्व आहे.

कुमार पुढे म्हणाले की, भारतीय निवडणुकीचे स्थान अनोखे आहे, कारण निवडणूक नोंदणी अनिवार्य नाही किंवा मतदान करणे अनिवार्य नाही. त्यामुळे, मतदार यादीचा भाग होण्यासाठी लोकांना स्वेच्छेने आमंत्रित करून आणि त्यानंतर, पद्धतशीर मतदार जागृती कार्यक्रमाद्वारे, त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यास प्रवृत्त करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाला आवश्यक आहे. “आम्ही हाती घेतलेल्या प्रक्रियेची विश्वासार्हता निवडणुकीतील मोठे मतदान आणि मतदार-लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मतदार याद्यांच्या निकट परिपूर्तीद्वारे प्रमाणित केली जाते असे म्हणणे स्वयंसिद्ध ठरेल” असे त्यांनी सांगितले.

भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या व्याप्तीबाबत अवगत करताना ते म्हणाले की देशभरात पसरलेल्या 1 दशलक्ष पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर 970 दशलक्ष मतदारांचे 15 दशलक्षाहून अधिक मतदान कर्मचारी स्वागत करतील. कुमार पुढे म्हणाले की, मतदान केंद्रांवर भेट देणाऱ्या पाहुण्यांद्वारे देशातील मतदारांची विविधता पूर्ण अभिव्यक्तीमध्ये अनुभवली जाऊ शकते असे कुमार म्हणाले. भारत हा उत्सवी देश आहे आणि लोकशाहीचा उत्सव प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रतिनिधींना निमंत्रित करतो असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, आयोगाने कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि नेपाळच्या मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत त्यांच्या शिष्टमंडळासह द्विपक्षीय संवादही साधला.

तत्पूर्वी, सकाळी पाहुण्यांना ईव्हीएम- व्हीव्हीपॅट, आयटी उपक्रम, मीडिया आणि सोशल मीडियाची भूमिका यासह भारतीय सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या विविध पैलूंबद्दल माहिती देण्यात आली. वरिष्ठ निवडणूक उपायुक्त धर्मेंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या माहिती सत्रात निवडणूक उपायुक्त आर.के. गुप्ता यांनी निवडणुकांचा आढावा घेतला आणि त्यानंतर वरिष्ठ निवडणूक उपायुक्त नितेश कुमार यांनी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट वर सादरीकरण केले. भारतीय निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान उपक्रमांवर महासंचालक (आयटी) नीता वर्मा आणि मीडिया आणि सोशल मीडिया यावर सहसंचालक (माध्यम) अनुज चांडक यांच्या सादरीकरणाचा या सत्रात समावेश होता.

विविध मतदारसंघातील निवडणूक आणि संबंधित तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे गट बनवून ते महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांना भेट देतील. 9 मे, 2024 रोजी या कार्यक्रमाची सांगता होईल. हा कार्यक्रम परदेशी निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रतिनिधींना भारताच्या निवडणूक प्रणालीतील बारकावे तसेच भारतीय निवडणुकीतील सर्वोत्तम पद्धतींबद्दल परिचित करेल.

या वर्षी, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सहभागाचे प्रमाण आणि आवाका यांच्या संदर्भात अशा पद्धतीचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम असून यामध्ये जगभरातील –भूतान, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, फिजी, किरगीझ रिपब्लिक, रशिया, मोल्दोवा, ट्युनिशिया, सेशेल्स, कंबोडिया, नेपाळ, फिलिपाईन्स, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश, कझाकस्तान, जॉर्जिया, चिली, उझबेकिस्तान, मालदीव्ज, पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया अशा 23 देशांमध्ये कार्यरत ईएमबीज तसेच संबंधित संस्थांचे 75 प्रतिनिधी सहभागी होत आहेत. निवडणूक यंत्रणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानाचे (आयएफईएस) सदस्य तसेच भूतान आणि इस्रायल या देशांतील माध्यमांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांच्या हस्ते मिल्खा सिंह स्टेडीयममध्ये दक्षिण कमांडच्या गीताचे अनावरण

Mon May 6 , 2024
पुणे :- आपल्या देशाच्या संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या अनेक महिनांच्या सामूहिक प्रयत्नातून साकारलेल्या “वंदे माँ भारती” या लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गीताचे अनावरण दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्ट. जनरल अजय सिंह यांच्या हस्ते 5 मे 24 रोजी झाले. प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग हे या गीताचे मूळ गायक आहेत. ब्रिगेडियर बिक्रमजीत सिंग, सुभाष सहगल आणि करण मस्ताना यांच्या या पदरचनेला मंत्रमुग्ध करणारे संगीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com