ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संकलीत केले पत्र
नागपूर :- केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे मिळालेल्या दिलासादायक सुविधांसाठी नागपुरातील तब्बल ५० हजार नागरिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. ‘धन्यवाद मोदीजी’ अशा आशयाचे पत्र लाभार्थी लिहून प्रधानमंत्र्यांचे आभार मानत आहे. नागपूर शहरातील लाभार्थ्यांकडून लिहिण्यात येत असलेली ही पत्रे भाजपा प्रदेश सचिव व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संकलीत करीत असून ते पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना त्यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्द केले.
सर्वसामान्य, गोरगरीबांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने, त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनातर्फे अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा नागपूर शहरातील लक्षावधी लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. योजनांमुळे मिळालेल्या लाभाने अनेकांच्या जीवनात आनंद भरले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात योजनांची अंमलबजावणी झाल्याने अनेकांना हा लाभ मिळाला. प्रधानमंत्र्याच्या या महत्वपूर्ण निर्णयासाठी नागरिकांकडून पत्र लिहून आभार मानले जात आहे. लाभार्थ्यांकडून लिहिण्यात येत असलेली ही पत्रे प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा नागपूरतर्फे पुढाकार घेण्यात आलेला आहे.
आमदार कृष्णा खोपडे, भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्यासह अनेक पदाधिकारी लाभार्थ्यांच्या घरोघरी भेट देउन त्यांच्याकडून लिहिण्यात आलेले पत्र स्वीकारत आहेत. अशी प्रभाग क्र २६ येथून सुमारे १२५ पत्रे सोपविण्यात आली.
या कार्यक्रमाला शहर संपर्क प्रमुख प्रा. प्रमोद पेंडके, माजी नगरसेविका समिता चकोले, मंडळ महामंत्री राजू गोतमारे, प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, अशोक देशमुख, ज्योती वाघमारे, सुनील कोठे, प्रशांत मानापुरे, प्रवीण बोबडे, सिंधू पराते, कविता हत्तीमारे, सुनील आग्रे, किशोर सायगन, करीश्मा देशमुख, रवी धांडे, दीनकर चापले, रामू मौजे, जेथूजी पुरोहित, सुरेश उधापुरकर, निखिल कावडे, जनार्धन पारधी, तुषार वासमवार, ललीत यादव, विक्रम डुंभरे, शंकर मेश्राम, गायत्री उचितकर, कल्पना सार्वे, मोसमी वासनिक, सुनिता कांबळे, शिला वासमवार, डॉली सारस्वत, ललीता वैष्णव आदी उपस्थित होते.