बांधकाम कामगारांनी आमिषास बळी पडू नये कामगार विभागाचे आवाहन

भंडारा :- इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाव्दारे बांधकाम कामगारांसाठी अनेक शासकीय योजना व पात्र लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यात येतो. हे सर्व लाभ देण्यासाठी संगणकीकृत प्रणालीचा वापर करण्यात येतो. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ हे संगणकीकृत प्रणालीद्वारे ऑन लाईन अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांच्या छानणी तपासणी अंती लाभ हे थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा केले जातात.

तथापि ही कामे करुन देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे.सबब सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करण्यात येते की,अशा कोणत्याही आमिष अथवा दबावास बळी पडू नये,व अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयांशी तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी तथा उपजिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,भंडारा यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हयात 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान

Sat Oct 14 , 2023
भंडारा :- कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे आणि कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 दरम्यान “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान ही मोहिम आरोग्य विभागाव्दारे राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com