– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 9:- हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था कामठी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
हरदास शैक्षणीक व सांस्कृतिक संस्था तर्फे हरदास हायस्कुल कामठी येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे उपस्थितीत होत्या.
सर्वप्रथम ताईंच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले .यावेळी मार्गदर्शनपर आपले विचार मांडतांना ताई म्हणाल्या की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी केलेल्या कार्यप्रमाणे आपली कर्त्यव्य पार पाडत असतांना आपल्या मध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाला हरदास हायस्कुल कामठी येथील मुख्याद्यापक गणेश सेंगर , जगताप सर , बोबडे सर , वासे सर , जुमडे सर श्री राऊत सर श्री टाकळखेडे सर सुके सर श्री सोमकुवर सर श्रीमती पाटील मॅडम मुरारकर मॅडम वानखडे मॅडम कापसे मॅडम घाटोळे मॅडम प्रभुणे मॅडम तसेच ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल कम्पठी चे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते