कोच्छी पुनर्वसन प्रकल्पाची कामे मे अखेर पर्यंत पुर्ण करावीत – सुनील केदार

नागपूर  : जिल्हयातील कोच्छी प्रकल्पाची अपूर्ण कामे येत्या मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकासक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

             निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, कार्यकारी अभियंता सयाम, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

        या बैठकीत कोच्छी पुनर्वसनबाबत सुरु असलेल्या प्रकल्पातील कामाच्या स्थितीबाबत, पाटणसावंगी येथील नदी वळण संदर्भात, सावनेर व कळमेश्वर येथील कालवा दुरुस्तीबाबत, बिड-चिचघाट बंधारे तसेच खेकरा नाला सौंदर्यीकरणबाबतचा आढावा घेण्यात आला.

प्रकल्पाची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन करुन या प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही यावेळी केदार यांनी दिले. 

????????????????????????????????????

         पुनर्वसन नवीन गावठाण्यासाठी सुविधा निर्माण करण्याची कामे तसेच कालवे प्रणालीचा विस्तार व सुधारणा यांची कामेही प्रगतीपथवर आहेत अशी माहिती विजया बनकर यांनी दिली.

पुनर्वसनाचे कार्य दीर्घकाल सुरु असते. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादा निश्चित करुन प्रत्येक प्रकल्पाचे ‘टाईम ऑडीट’ झाले पाहिजे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अहिल्यादेवी यांच्या श्रेष्ठ कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Sun Apr 17 , 2022
राज्यपालांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान अभिनेते इरफान खान यांना मरणोत्तर पुरस्कार भिवंडी महापौर प्रतिभा पाटील, भाऊ कदम, समीरा गुजर देखील सन्मानित मुंबई –  समाजाच्या अनेक क्षेत्रात आज नैतिक ऱ्हास होताना दिसत आहे. स्वार्थाचा विचार बळावत आहे.  स्वतः पलीकडे जाऊन आपल्या समाजासाठी व देशासाठी थोडे जरी काम केले तरीही समाज उन्नत होईल. या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com