संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
पोस्टे कन्हान ला आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, दोन आरोपी अटक.
कन्हान : – परिसरात आणि ग्रामिण भागात गुन्हेगारी चे प्रमाण दिवसेन दिवस वाढत असुन नागपुर जबलपु र राष्ट्रीय महामार्गवर संताजी नगर कांद्री येथे आठ आरोपींनी संगमत करून एका युवकावर चाकुने हल्ला करून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी विरेंद्र यादव यांच्या तक्रारीने पोस्टे ला आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.४) डिसेंबर ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान विरेंद्र रामअवतार यादव वय ५० वर्ष राह. वार्ड क्र.५ कांद्री- कन्हान यांनी खाद्य पदार्थाचा ठेला लावला असता रात्री १० वाजता दरम्या न ठेला बंद करित असतांना एक्टीवा मोपेड वर एक अनोळखी इसम आला व त्याने विरेंद्र ला शिविगाळ केली. तेव्हा विरेंद्र यांनी अनोळखी इसमा ला म्हटले कि मला तु शिवीगाळ का करीत आहे. असे विचारले असता अनोळखी इसमाने विरेंद्र ला तुने गलत जगह पर हाथ डाला है ! असे म्हणुन धमकी दिली. तेव्हा विरेंद्र याने विचारले की कोणत्या गलत जागी हाथ टाकला. तर इसमाने तु रूक जा, मैं अभी तुझे बताता हुँ, असे म्हणुन त्याने मोबाईल ने फोन करून त्याच्या साथीदारांना विरेंद्र च्या ठेल्याजवळ येण्यास सांगितले. सदर इसमाचे संभाषण ऐकुन विरेंद्र यांनी आपल्या पत्नी सौ. राधिका हिला फोन करून सांगितले कि, आपल्या ठेल्याजवळ काही गडबड होण्याची शक्यता असल्याने घरातील पुरूष माणसांना ठेल्याजवळ लव करात लवकर पाठव असे सांगितले. अंदाजे ४ ते ५ मिनटाने मोटर सायकलवर इरफान शेख उर्फ चोरवा व दोन अनोळखी साथीदारा सह विरेंद्र च्या ठेल्याजवळ पोहचले. इरफान चोरवा व त्याचे साथीदाराने विरेंद्र यास हातबुक्कीने मारहाण करण्यास सुरवात केली असता विरेंद्र चा पुतण्या हिमांशु तिथे पोहचला. त्याने विरेंद्र याला मारत असलेल्या मुलांशी झटापट करू लागला. तेव्हा सोबत इतर आलेल्या चार साथीदारा पैकी बाजुला उभा असलेला अमन कैथवार व इतर तीन अनोळखी साथीदारांनी विरेंद्र चा पुतण्या हिमांशु याला विरेंद्र पासुन बाजुला ओढले. त्यातील दोन आरो पीनी विरेंद्र चा पुतण्या पाहुण इरफान चोरवा याने हिमांशु चे हात धरले. अमन कैथवार याने त्याचा हाता तील चाकु उगारला व चौथ्या साथीदाराने कमर के नीचे मार असे म्हणताच अमन कैथवार ने विरेंद्र च्या पुतण्या हिमांशु याच्या ढुंगणाच्या उजव्या बाजुस चाकु मारून गंभीर जख्मी केले. विरेंद्र यांचा भाऊ सुरेंद्र यादव आणि मुलगा शिवांशु असे तिथे आले. तर तेव्हा त्यांना आरोपी पळुन गेले.
सदर घटनेत जख्मी हिमांशु यास त्याचा भाऊ व नागरिकांच्या मदतीने उचलुन विरेंद्र च्या मालकीच्या पिकअप मध्ये उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान ला नेत असतांना पैश्याकरिता विरेंद्र ने पॅन्टचा खिशात हात टाकला असता पॅन्टच्या उजव्या खिशाती ल रोख ५०० रू.च्या ६ नोटा म्हणजे ३००० रूपयाची चोरी झाल्याचे लक्षात आले. विरेंद्र व हिमांशु यास उपचारासाठी घेऊन निघत असतांना सदर आरोपीतां च्या दहशतीमुळे परिसरातील लोकानी आपआपली दुकाने बंद केली. आणि लोक सैरावैरा पळत निघाली होती. विरेंद्र आणि पुतण्या हिमांशु यास उपचाराकरि ता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासुन प्राथमिक उपचार केला. व हिमांशु याला जास्त मार असल्याने पुढील उपचार चौधरी रुग्णालय कामठी येथे सुरू आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले आणि उपवि भागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी भेट दिली.
सदर प्रकरणाी कन्हान पोलीसांनी फिर्यादी विरेंद्र यादव च्या तक्रारीने पोस्टे ला आरोपी १) इरफान शेख उर्फ चोरवा, २) अमन कैथवार, ३) अमन खान, ४) नितीन खोब्रागडे, ५) डिस्को विशाल व त्याचे तीन अज्ञात आरोपी यांचे विरुद्ध अप क्र. ६९९ /२२ कलम ३८७, ३९७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास नागपुर ग्रामिण अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बाग वान यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे, कन्हान पोलीस सह स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस आरोपी शोध घेत आहे.