तुमसर तहसील कार्यालयावर धडकला किसान गर्जनेचा ट्रॅक्टर मोर्चा

नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी

मोहाडी  :  किसान गर्जना व्दारे काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा अतिशय विराट होता, शेकडो ट्रॅक्टर सहित मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते, बोनस व इतर मागण्यांसाठी शेतकरी बांधव खुप सरसावले होते, किसान गर्जनेचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात तुमसर तहसील कार्यालयावर विक्रमी ट्रॅक्टर मोर्चा धडकला.

राजेंद्र पटले त्यांनी आपल्या संबोधनात राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीवर तर केंद्राच्या मोदी सरकारवर चांगलेच बरसले.

विधानसभा निवडणुकीत धानाला पाचही वर्ष रू ७००/- प्रति क्विंटल बोनस देऊ असे वचन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी ५ वर्षासाठी शासनाला निवडून दिले होते, परंतु वचनपूर्ती न कर्ता या वर्षी बोनस गहाळ करून शेतकऱ्यांचा विश्वास घात केला ,जि.प.च्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक मान्यवर नेत्यांनी तेज तर्रार भाषणाच्या व्दारे डि.बी.टी.च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल असे सुध्दा वचन दिले होते, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हज्जार प्रोत्साहन राशी देण्यात येईल असे वचन सुध्दा दिले होते, परंतु वचन पूर्ती न केल्यामुळे शेतकऱ्यां मध्ये आक्रोश निर्माण आहे.

आता रब्बी हंगामातील धान अत्यंत कमी क्विंटल प्रति एकर घेण्याचा विचार शासन घेत आहे, परंतु आम्ही शेतकरी झोपलेले नसून जागृत आहोत, बोनस/डि.बी.टी.ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा झालीच पाहिजे, ५० हज्जार प्रोत्साहन राशी त्वरित खात्यावर जमा झालीच पाहिजे,२० क्विंटल प्रति एकर रब्बी हंगामातील धान घेण्याचे जाहीर झालेच पाहिजे, व ज्या  शेतकऱ्यांचे ७/१२ आन लाईन झालेले नाहीत त्यांचे आन लाईन करण्याची साईट नेहमीच सुरू असलीच पाहिजे,पावसाळा तोंडावर असताना सुद्धा अद्याप धान खरेदी का सुरू झालेली नाही ती त्वरित सुरू झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचे शेतावरील विद्यृत बिल नेहमीसाठी मुक्त करण्यात यावे अन्यथा धानाला रू ३०००/- प्रति क्विंटल आधारभूत किंमत तरी जाहीर झालीच पाहिजे, उसर्रा पुलाची SIT चौकशी झालीच पाहिजे व उर्वरित सिंचन प्रकल्पांचे कालवे त्वरित पूर्ण झालेच पाहिजे, ह्या सर्व अतिशय रास्त मागण्या असुन शासनाने त्वरित मान्य करावे यासाठी ” किसान गर्जना ” व्दारे भव्य धडक विक्रमी विराट ट्रॅक्टर मोर्चा मंगळवार दि. ३० मे २०२२ रोजी दुपारी ३ वाजे तुमसर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून तहसील कार्यालयावर  काढण्यात आला. किसान गर्जनाच्या वतीने तुमसर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना  देण्यात आले. यावेळी माजी सभापती भोजराम पारधी, सरपंच महेश पटले उपसरपंच मनोज शरणागते, विनोद शरणागते, अंकुश पटले, नरेश टेंबरे, प्रताप टेंबरे व तालुक्यातील शेतकरी बांधव, पदाधिकारी कार्यकर्ते शेकडोच्या संख्येत उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मरियम अम्मा दर्गा गाडेघाट ला तीन दिवसीय वार्षिक उर्स थाटात साजरा

Tue May 31 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – पश्चिमेस ४ कि मी वर असलेल्या गाड़ेघाट येथील हुजूर मरियम अम्मा दर्गा येथे १५० वा तीन दिव सीय वार्षिक उर्स मिलाद शरीफ, शाही संदल विवि़ध कार्यक्रमासह महाप्रसाद वितरण करून वार्षिक उर्स थाटात साजरा करण्यात आला. हुजूर मरियम अम्मा दर्गा गाड़ेघाट येथे १५० वा तीन दिवसीय वार्षिक उर्सचे शनिवार (दि.२८) मे २० २२ ला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com