अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई होणार – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

मुंबई  : अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावीकर्जदारांच्या तक्रारींची दखल घ्यावीअसे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. सनदशीर मार्गाने कर्ज वसुली न करता ज्या कंपन्या कर्जदारांना अन्यायकारक वागणूक देत आहेतअशा कंपन्यांविरोधात कर्जदारांनी पोलीसात तक्रार द्यावीअसे आवाहन गृहराज्यमंत्री  देसाई यांनी केले आहे.

            कोल्हापूर जिह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीने होणाऱ्या कर्ज वसुलीबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर, आमदार नरेंद्र दराडे, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेनासह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेकोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे तर दूरदृश्यप्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहियापुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले कीमायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून असभ्य भाषेचा वापर करणेकर्जदारांना रस्त्यात अडविणेघरात घुसणे अशा प्रकारचे वर्तन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्याअवैध कर्ज वसुलीबाबत पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. तक्रारींची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या अवैध कर्ज वसुलीबाबतच्या तक्रारींचा अहवाल पोलिस अधीक्षकांनी सादर करावा. हा अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाईल. कंपन्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीला वेळीच आळा घातला पाहिजेअसेही गृह राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करावा - मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Thu May 26 , 2022
मुंबई –  एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणा-या अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात येते. या अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश  महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव  आय.ए.कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights