-आकाश राउत,खापरखेडा
– एका आठवड्यात काम सुरू न झाल्यास दि. 2 फेब्रुवारी २०२२ ला सकाळी ११ वाजता खापरखेडा कोराडी देवी मंदिर मार्गावर रास्ता रोको आंदोलन
खापरखेडा – खापरखेडा व कोराडी औष्णिक वीज केंद्राला वीज उत्पादन लागणारा कोळसा जवळच्या कोळसा खाणीतून आणण्यासाठी इस्जेक हेवी इंजिनिअरिंग कंपनीला महानिर्मिती कंपनीकडून शेकडो रुपयांचे कंत्राट देऊन कन्व्हर वे काम युद्धपातळीवर सुरू आहे कन्व्हर वे परिसरातून जाणारे मार्ग पुन्हा नव्याने करण्याचे सदर कंत्राटामध्ये नमूद करण्यात आलेले आहे मात्र सदर कंपनीने मार्ग तयार केले नाहीत.
खापरखेडा कोराडी देवी मंदिर नागपूर व ईतर ठिकाणी जाण्यासाठी सोयीचा असल्यामूळे वीज कामगार अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक, लहान मोठी वाहने या मार्गाचा उपयोग करतात मात्र सदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अण्णा मोड ते कोराडी पंप हाऊस पर्यंत खराब झालेला आहे या मार्गावर ठिकठिकाणी खोल खड्ड्यामुळे या मार्गावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे व खड्ड्यात पाणी साठा होत असल्यामुळे नागरिकांना विविध प्रकारचा त्रास व आजाराने ग्रासले आहे.
यासंदर्भात सावनेर पंचायत समितीच्या मासिक मिटिंग मध्ये ठराव पारित करण्यात आला असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खापरखेडा कोराडी देवी मंदिर मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याबाबत सुचविले आहे शिवाय वेळोवेळी सावनेर तहसील कड़े ही पत्रव्यवहार करण्यात आला आहे मात्र दुर्दैव कोणतेही तसदी घेण्यात आली नाही.
सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता एका आठवड्याच्या आत खापरखेडा-कोराडी देवी मंदिर मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश संबंधित कंपनीला देण्यात यावे एका आठवड्यात काम सुरू न झाल्यास दिनांक 2 फेब्रुवारी २०२२ ला सकाळी ११ वाजता खापरखेडा कोराडी देवी मंदिर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
यादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सम्पूर्ण जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी हि आग्रहाची विनंती.