केंद्रीय यंत्रणा परमवीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय मात्र एक दिवस एनआयएला खरं काय आहे ते सांगावं लागेल – नवाब मलिक

मुंबई – केंद्रसरकार व भाजपसोबत परमवीरसिंग यांचं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते त्यातूनच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमवीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय मात्र एक दिवस एनआयएला खरं काय आहे हे सांगावं लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडले आहे.

परमवीरसिंग यांने खोटे आरोप आणि राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना फसवलं आहे. सरकारला व अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा दुरुपयोग केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून झाला असेही नवाब मलिक म्हणाले.

या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने चांदीवाल आयोग नेमला असून या आयोगासमोर सचिन वाझे याने अनिल देशमुख यांना पैसे दिले नाही असा जवाब नोंदवला असल्याचे समोर येत आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

परमवीरसिंग यांनी जिलेटीनचे जे कांड केले त्यामध्ये एनआयएने परमवीरसिंग यांचा जवाब नोंदविल्यानंतर ते फरार झाले. मात्र एनआयएने चार्जशीटमध्ये जो मास्टरमाईंड आहे तो कोण आहे हे सांगितले पाहिजे. एनआयएने अद्याप त्यावर चार्जशीट का दाखल केली नाही परमवीरसिंग यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली. त्यांचं नाव घेतलं जातं, ड्रायव्हरचा जवाब सांगितला जातो, इनोव्हा गाडीची चर्चा होते मात्र परमवीरसिंगच्या नावाची चर्चा होत नाही. एनआयए केंद्रसरकारच्या दबावाखाली परमवीरसिंग यांना वाचवतेय हे सत्य आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

दिग्गजांनी जागवल्या दिलीप कुमार यांच्या आठवणी

Wed Dec 15 , 2021
-सुभाष घई यांनी कू वर शेअर केले हळवे क्षण मुंबई : सिनेमाच्या दुनियेत आपल्या स्वतंत्र प्रतिभेने मुद्रा उमटवणारे अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. दिलीप कुमार यांची 99 वी जयंती सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये साजरी झाली. दिलीप कुमार यांना त्यांचे चाहते खूप मिस करत आहेत. सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या कार्यक्रमात दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो आणि अभिनेता धर्मेंद्र यांनी स्मृतींना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!