संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत सन 2021-22 चा तालुका स्तरावरील स्मार्ट ग्राम पुरस्कार हा कामठी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत असणाऱ्या कापसी(बु) गावाला मिळाला आहे.
कामठी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली कापसी (बु) ग्रामपंचायत तर्फे गावात विविध शासकीय योजना तसेच कामे अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्या जात आहेत त्यामुळे हे गाव आदर्श गाव ठरले असताना या गावाला सन 2021-22 च्या आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गत सन 2021-22 च्या स्मार्टग्रामच्या तालुका स्तरावरील पुरस्कारासाठी या गावाची निवड झाली आहे. त्यामुळे काल 16 फेब्रुवारीला नागपूर जिल्हापरिषदच्या खेडकर सभागृहात सरपंच तुळसाबाई शेंदरे व माजी सरपंच श्यामराव डांगरे व सचिव पंकज डांगर यांना जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा व महिला व बाल कल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कामठी पंचायत समिती गटविकास अधिकारी अंशुजा गराटे ,पंचायत विभाग नागपूर चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.