नागपूर :- बामसेफ, बी आर सी, डी एसफोर व बसपाचे संस्थापक मान्यवर कांशीरामजी हे पूर्वी पुण्याच्या रक्षा विभागात (डिफेन्स) वैज्ञानिक पदावर कार्यरत असताना त्याच कार्यालयात भन्ते विमलकीर्ती हे कार्यरत होते. कांशीरामजींनी 1964 ला नोकरी सोडून स्वतःला सार्वजनिक कार्यात झोकून दिले. त्याच पद्धतीचे कार्य विमलकीर्ती यांनी पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे त्रेलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण (TBMS) ला झोकून दिले.
त्यांनी भन्ते संरक्षित यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर भारतातील काम सांभाळले. पुढे त्यांच्यात मतभेद झाल्याने त्यांनी थायलंड येथे जाऊन श्रामनेर ची दिक्षा घेतली. त्यानंतर स्वतःची महानाग शक्यमुनी विज्ञासन नावाने (बुद्धिस्ट सेमिनरी) सुरू केली. त्या सेमिनरीतून शेकडो आदर्श विद्यार्थी व भन्ते डॉ. चंद्रकिर्ती, डॉ. नीरज बोधी, भन्ते डॉ. आनंद, भन्ते डॉ. सारिपूत्त, डॉ. नागसेन लांडगे, डॉ. रमेश रोहित, डॉ. सुजीत वनकर सारखे असंख्य शीलवान, नीतिमान भिक्खू, शिक्षक निर्माण झालेत. सध्या नागपूरात असलेल्या भिक्खू संघातील विद्वान भिक्खू म्हणून विमलकीर्ती ह्यांची गणना केली जाते.
15 आक्टोंबर ला नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागात अभीधम्म या विषयावर भन्ते विमलकीर्ती गुणसिरी यांचे प्रमुख व्याख्यान झाले. त्यानंतर सायंकाळी दिल्लीचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्यासोबत चंद्रमणी नगर चौकात जाहीर व्याख्यानाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
या दरम्यानच्या काळात 15 ऑक्टोबर ला दुपारी त्यांनी बसपा नेते उत्तम शेवडे यांच्या निवासस्थानी असलेल्या कांशीरामजी सार्वजनिक वाचनालयातील कांशीरामजींच्या अस्थी ला भेट दिली. या प्रसंगी भन्ते गुणसिरी यांनी कांशीरामजींच्या संबंधातील काही आठवणींना उजाळा दिला. कांशीरामजी सुद्धा भिक्खू सारखे चालते फिरते प्रचारक होते त्यामुळे त्यांनंतर त्यांच्या भेटीगाठी झाल्या नाही. अनेक वर्षानंतर कांशीरामजींच्या अस्थींचेच दर्शन झाल्याने त्यांनी मात्र स्वतःला धन्य समजले. कारण दरम्यानच्या काळात कांशीरामजीने आपल्या कार्याने फार मोठी उंची गाठल्याचे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.