संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
ब्रिटिशकाळीन जुना पुल शेवटची घटका मोज ताना सुध्दा जनप्रतिनिधी व अधिका-यांचे दुर्लक्ष.
कन्हान : – काश्मीर ते कन्याकुमारी या दोन टोकाना जोडणा-या नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान नदीवर अत्यंत संथ गतीने बांधण्यात आल्याने नवीन पुलाचे आठ वर्षानी उद्घाटनाचा मुहुर्त अखेर निश्चित झाला असुन १ सप्टेंबर २०२२ रोजी नविन पुल व अप्रोच रस्त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
भारताच्या प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेला व काश्मीर ते कन्याकुमारी या दोन टोकाना जोडणा-या नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर कन्हान नदीवरी ल जुना झालेल्या ब्रिटिशानी बांधलेल्या पुलाची काल मर्यादा संपल्यावर सुद्धा कन्हान नदी जुन्या पुला वरून अवजड वाहतुक मोठ्या प्रमाणात बिनधास्त सुरू असु न रेल्वे फाटक बंद असताना जड वाहनाच्या रांगाच रांगा कित्येक वेळा लागुन पुलाच्या मध्यंतरी उभ्या वाह न चालकांना हुदयाचे ठोके स्पष्ट ऐकु येऊ भितीपोटी पुल कधी पार करतो. अशी जिव काशाविशा होत अस तो. पुल जिर्ण झाल्याने पुलाचा दोन्ही बाजुच्या लाव ण्यात आलेल्या रेलिंग काही काही ठिकाणा तुटलेल्या असल्याने दुचाकी, चारचाकी वाहने नदीत पडण्याची शक्यता बळावली आहे. तसेच रेलिंग ला सुरक्षा देणारे दगड-विटा निघत असल्याने पुल कोसळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. यास्तव स्थानिक सामाजि क लोकहीतार्थ सदैव पुढे असणारे कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रामटेक लोकसभेचे खासदार कृपाल तुमाने, विधानसभेचे आमदार आशिष जैस्वाल सह जनप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिका-यांना वारंवार निवेदने दिले. ब्रिटिश काळीन जुना पुल शेवटची घट का मोजत असुन सुध्दा संबंधित जनप्रतिनिधी व अधि कारी जुन्या पुलाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत अस ल्याचे बोलल्या जात आहे. दिडशे वर्ष पुर्ण होत अस ल्याने जुन्या पुलावरून वाहतुक सुरक्षित नसुन बंद कर ण्याचे ब्रिटिश सरकारने पत्र भारत सरकारला दिल्याचे स्पष्ट होताच स्थानिक पत्रकारांनी जनतेला धोका निर्मा ण होण्याची शक्यता वर्तमान पत्रात विशेष लावुन धर ल्याने २५ फेब्रुवारी २०१४ ला तत्कालीन रस्ते वाहतु क केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्या हस्ते नवीन पुलाचे भुमिपुजन करण्यात आले होते. ३५.९२ कोटी खर्च करून बांधण्यात येणारा हा पुल ३९०.९५ मीटर लांब. पुलाची रूंदी १४.८० मीटर असुन दोन्ही बाजुला दिड मीटरचा फुटपाथ सोडण्यात आला. करारानुसार पुलाचे काम २१ महिन्यांत पुर्ण करायचे होते. मात्र पुलाच्या बांधकामात वारंवार येणाऱ्या अडचणी, संथ गतीमुळे लांबत असल्याने पुलाचे काम दुसऱ्या कंपनी ला सोपविण्यात आल्याने कामात गती येऊन पुलाचे बांधकाम जवळपास पुर्ण होऊन एक ते दोन महिन्या चा कालावधी झाला तरी सुद्धा पुलाचे उद्घाटन कधी होईल व वाहन चालकांना, नागरिकांना जुन्या पुल व नेहमी बंद होणा-या रेल्वे फाटका पासुन कधी सुटका मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कन्हान नदीवरील ब्रिटिश काळीन जिर्ण पुल व रेल्वे गेट मुळे वारंवार होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कन्हान नदीवरीव नवनिर्माण पुल व अप्रोच रस्ता ये-जा करण्यास सुरू करण्याकरिषा स्थानिक नागरिकांनी व भाजप चे रिंकेश चवरे, शैलेश शेळके, नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांनी भाजपा महा. प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पुला बाबत चर्चा करून नविन पुल त्वरित सुरू करण्याचे निवेदन दिले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर विषय गांभीर्याने घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवुन कन्हान नदी नवीन पुलाचे उद्घाटनाची वेळ मागितली असता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे आणि संबंधित विभागा च्या अधिका-या सोबत चर्चा करून पुलाचे उर्वरीत बांधकाम तात्काळ पुर्ण करण्याचे आदेश दिले व १ सप्टेंबर रोजी नवीन पुलाचे उद्घाटनाची वेळ दिल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन पुलाच्या उद्घाटना नंतर रेल्वे फाटक वारंवार बंद होणे, पुलावर लांबच लांब रांग लागण्याची परिस्थिती आणि इतर समस्यांपासुन सर्वसामान्य प्रवाशांची सुट का होणार असल्याने केंद्रीय मंत्री मा नितीन गडकरी यांचे हस्ते १ सप्टेंबर २०२२ ला उद्घाटन करून नविन पुल रहदारी करिता सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. याप्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक, कांद्री शहराध्यक्ष गुरुदेव चकोले, रिंकेश चावरे, शैलेश शेळके ,शिवाजी चकोले, सुनील लाडेकर, पारस यादव, श्रावण वतेकर, कामेश्वर शर्मा, संजय रंगारी, मयुर माटे, सौरभ पोटभरे, हितेश साठवणे, सुषमा मस्के, तुळजा नानवटकर सह भाजपा सदस्य व कार्यकर्ता उपस्थित होते.