सावनेर – संस्कृत संभाषण वर्गाचे शिक्षक अविनाश मनोहर आसरे यांनी मुलमुले मॅन्शन , सावनेर येथे या संस्कृत वर्गाच्या माध्यमाने संस्कृत भाषेचे महत्व, संस्कृत भाषा शिक्षणाची गरज व संस्कृत भाषेचा दैनंदिन जिवनामध्ये देणारा फायदा तसेच संस्कृत संभाषण व भाषेची ओळख प्रभाविपणे दहा दिवसीय शिबीरामध्ये 20 च्या वर विद्यार्थाना करून दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर सावनेर नगर संघचालक डॉ नितीन पोटोडे व संस्कृत भारती चे नागपूर महानगर मंत्री, संभाजी पाटील उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीचे चार महत्वाचे भाग गीता, योगसूत्र, आयुर्वेद व वैदिक गणित हे ज्ञान मुळातच संस्कृत मध्ये असल्यामुळे, संस्कृत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्कृत भारती सदैव कार्यरत राहील असे आश्वासन दिले. तसेच संस्कृत संभाषण वर्गातून भावी कार्यकर्ते निर्माण होतील असा विश्वास शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करतांना व्यक्त केला.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सावनेर नगर संघचालक डॉ. नितीन पोटोडे हे उपस्थीत होते. त्यांनी संस्कृत भाषेचे उगम व महत्व बाबत सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संख्या गीत अॅड. माधुरी चौधरी यांनी केले, अॅड. अन्वेषा मुलमुले हिने सांघिक गीत,चंचल लिखितकर हिने व्यक्तिगत गीत व प्रविण सावल यांनी देशभक्ती सादर केले. ध्रुव पानपत्ते व तितकशा डफरे यांनी लघु संवाद सादर केला. वस्तू परिचय स्वाती नेवारे हिने सादर केले. अॅड. ज्योत्स्ना शेंडे यांनी आपले अनुभव व्यक्त केले. अॅड.अभिषेक मुलमुले यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तसेच या कार्यक्रमाला अभिषेक गाहरवार, प्रविण नारेकर, किशोर सावल, राजन देशपांडे, मंजुषा देशपांडे , हरीश पानपत्ते व इतर नागरिक उपस्थित होते.