संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– दोन आरोपी अटक, एक पसार व २२,६५,००० रु मुद्देमाल जप्त.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा टोल नाक्या जवळ अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रक ला कन्हान पोलीसांनी पकडुन दोन आरोपीस पकडले असुन एक पसार होण्यास यशस्वी झाला. त्यांचेे जवळुन २२ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.१४) मे ला रात्री ८:३० ते ९ वाजता दरम्यान पोहवा सतिश फुटाणे , सचिन वेळेकर, पोना आतिश मानवटकर, निखिल मिश्रा, रवि मिश्रा सह पोलीस कर्मचारी परिसरात सर कारी वाहनाने पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमी दारा कडुन माहिती मिळाली कि अशोक लेलॅंन्ड १४ चाकी ट्रक क्र. एमएच ४० सीडी ९९७५ मनसर कडुन अवैधरित्या विनापरवाना वाळु ट्रक मध्ये भरुन वाहतु क करित आहे. अश्या माहितीवरुन पोलीसांनी बोरडा टोल नाका येथे नाकाबंदी करुन अशोक लेलॅंन्ड ट्रक ला थांबवले.
पोलीसांनी ट्रक चालक सोनु ऊर्फ शाह रुख वल्द रोउफ खान (वय २९) रा. हुसैनपुर उत्तर प्रदेश, २) वैभव किशनराव खोब्रागडे (वय २५) रा. अमरावती यांस विचारफुस केले असता त्यांनी ट्रक मध्ये वाळु असल्याचे सांगितले. रेती बाबत राॅयल्टी व कागदपत्रा बाबत विचारले तर राॅयल्टी नसल्याचे आणि वाळु मालक अमोल रमेश देशमुख रा. पुलगाव वर्धा यांचा सांगण्यावरुन नागपुर येथे घेऊन जात असल्याचे सांगितल्याने पोलीसांनी आरोपी १) सोनु ऊर्फ शाहरुख वल्द रोउफ खान, २) वैभव किशनराव खोब्रागडे यांना अटक करुन त्याचा जवळुन अशोक लेलॅंन्ड ट्रक किंमत २२,००,००० रु, अंदाजे दहा ब्रास वाळु किंमत ६०,००० रु, एक मोबाइल किंमत ५००० रु असा एकुण २२,६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सरकार तर्फे फिर्यादी आतिश मानवटकर यांचे तक्रारीवरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले हे करित आहे.