नागपूर – रविवारी नुकत्याच झालेल्या आयोजित कार्यक्रमात, लक्ष्मी नगरात “राणी लक्ष्मीबाई “सभागृत सुप्रसिद्ध आहारतज्ञ स्नेहल दाते यांचा कुकरी शो व पुष्परचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेत.
हिरव्या पालेभाज्याचे महत्व सांगुन त्यांनी ‘हराभराकवान, हेल्दीग्रीन सूप, कोरियांडर सूप, ग्रीन लेमन सूप, असे अनेक पदार्थाचे शरिरासाठी महत्व सांगुन प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना प्रश्नांची उतरे दिली व अत्यंत महत्वाच्या सूचनाही दिल्या तसेच पुष्परचना स्पर्धेत महिलांनी भाग घेऊन परिशक अनुपमाताई गिजरे यांनी रचना कशी असावी ह्यांचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विदर्भ गॅस चे व्यवस्थापक गजानन पेशकर व सहकारी यांनी महिलांनी गॅस वापरतांना घ्यावयाची काळजी या विषयी महत्वाच्या सुचना दिल्या. संस्थेच्या अध्यक्षा सौ. कांचनताई गडकरी, सचिव विजयाताई भुसारी, अपर्णाताई शिरपुरकर व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात संचालिका निलीमा बावने, नेहा लघाटे, रेखा सप्तर्षी, अंजली मुळे, निलिया गडीकर, रश्मी पोकळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे संचालन सौ.राखी जामकर तर आभार प्रदर्शन सौ.अंजली मुळे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.