संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 08:- प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे फेरफार प्रकरण व अन्य समस्यांचे निराकरण करणे तसेच सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकालि काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख , कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विमला बी यांच्या मार्गदर्शनार्थ 1 ऑगस्ट 2021 ते 31 जुलै 2022 पर्यंत महाराजसव अभियान राबविण्यात येत आहे .या महाराजस्व अभियान अंतर्गत आज 8 जून ला कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली व नायब तहसीलदार ब्रह्मनोटे, यांच्या मुख्य उपस्थितीत एक दिवसीय फेरफार अदालत आयोजन करण्यात आले होते.
यानुसार आज झालेल्या फेरफार अदलतीत अधिकाधिक शेतकरयानी सहभाग नोंदविला असून या अदालतीत सातबारा फेरफार, खरेदी वारसान फेरफार, हक्क सोड़, बक्षीस पत्र, शेताची रजिस्ट्री,अधिकार अभिलेख आदि कामे पाहण्यात आले असून यामध्ये तालुक्यातील एकूण पाच मंडळातील एक महिन्याच्या वरील एकूण 41 फेरफार निकाली काढण्यात आले.
सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत आज कामठी तहसील कार्यालयात पार पडलेल्या फेरफार अदलतीत तहसीलदार अक्षय पोयाम, नायब तहसीलदार राजीव ब्रह्मनोटे , मंडळ अधिकारी महेश कुल्दीवार, मंडळ अधिकारी संजय अनव्हाणे,मंडळ अधिकारी ,संजय कांबळे, यासह तलाठी वर्ग , आदिनी महत्वाची भूमिका बजावली .
कामठी तहसील कार्यालयात फेरफार अदालत
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com