संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
स्लग-कुंभारे कॉलोनी च्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त
स्लग-चार आरोपीना अटक, चोरीस गेलेला 1 लक्ष 30 हजाराचा मुद्देमाल जप्त,
चोरीचे 5 गुन्हे उघडकीस
कामठी ता प्र 3 :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत चोरट्यानी हैदोस माजला असून दिवसेंदिवस चोरीच्या घटनेचे प्रमाण वाढीवर होते त्यातच कुंभारे कॉलोनीत झालेल्या घरफोडी प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपीचा शोध लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून चार आरोपीना अटक करण्यात यश गाठीत त्यांच्याकडून चोरीस गेलेला 1 लक्ष 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दरम्यान त्यांच्याकडून 5 चोरीचे गुन्हेसुद्धा उघडकीस करण्यात आले.
अटक चार आरोपीमध्ये मोहम्मद जुबेर उर्फ जाबिर बरकत अली हैदरी वय 25 वर्षे रा आझाद नगर कामठी, विभोर विशाल नागदेवे वय 19 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी, सलमान खान उर्फ सलमान भाई मोहम्मद खान वय 19 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी, निखत जबिन उर्फ निक्खि साजीद खान वय 38 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, एसीपी नयन आलूरकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, गुन्हे पोलीस निरीक्षक गड्डीमे यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले,पोलीस हवालदार संतोषसिंग ठाकूर, देवानंद सार्वे,निलेश यादव,राजू टाकळकर,उपेंद्र आकोटकर, रोशन डाखोरे, महिला अंमलदार दीप्ती मोटघरे, सुजाता कुर्वे यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.