कामठी नगर परिषद चा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-अंतिम मतदार यादी 1 जुलै रोजी होणार प्रसिद्ध
कामठी ता प्र 11 :- आगामी काळात होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीचा कार्यक्रमानुसार 21 जून ला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून यावर 27 जून 2022 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे तर या हरकती वरील सुनावणी नंतर 1 जुलै ला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.त्यामुळे कामठी नगर परिषद निवडणुकीला आतापासूनच गती मिळत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
निवडणुकीचा एक भाग अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होताच तडकाफडकी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहिर करून राज्य निवडणुक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केल्याने निवडणुकीच्या कामाला गती आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता दरम्यान निवडणुकीचा टप्पा म्हणून मतदार यादी अंतिम करणे ,ती जाहीर करण्याची तारीख ही निश्चित झाल्याने आता निवडणुका केव्हाही लागू शकतील असा विश्वास व्यक्त करीत आजी माजीसह नवीनच इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलताना दिसत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विद्युत खांबावरील ऍल्युमिलियम तार चोरी करणाऱ्या अट्टल तीन चोरट्यास अटक

Sat Jun 11 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -अटक चोरट्याकडून 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 11:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आवंढी शिवारातून शेतातून जाणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरील तारांची चोरी करणाऱ्या अट्टल तीन चोरट्यास नवीन कामठी पोलिसांनी अटक करून 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गतरात्री सात वाजेच्या सुमारास केली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com