ई-रजिस्ट्रेशन चा वापर करा आणि घरबसल्या दस्त नोंदणी करा-दुय्यम निबंधक कपले.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-निरोप समारंभ प्रसंगी आवाहन 

कामठी ता प्र 31:- मुद्रांक व नोंदणी विभागाने नव्याने सुरू केलेल्या ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करा आणि घरबसल्या दस्त नोंदणी करा व मुद्रांक व नोंदणी विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच जनतेला अधिकाधिक गतिमान सेवा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग सदैव प्रतिबद्ध असल्याचे मनोगत कामठी चे दुय्यम निबंधक व पदोन्नतीने पदस्थांपना झालेले नागपूर ग्रामीण क्र 7 चे सह दुय्यम निबंधक अधिकारी कपले यांनी आयोजित त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.

कामठी चे नोंदणी व मुद्रांक विभागाचे दुय्यम निबंधक कपले यांची पदोन्नतीने नागपूर ग्रामीण क्र 7 च्या सह दुय्यम निबंधक पदी पदोन्नतीने पदस्थांपना झाली त्यांना नवीन जागी रुजू होण्यासाठी आज निरोप समारंभ देऊन कार्यमुक्त करण्यात आले.याप्रसंगी ऍड आशिष वंजारी,सचिन राऊत, मनीष रामटेके , राजेश कांनफाडे,संजय मेश्राम ,राजु देशभ्रतार ,दिशांत ठाकूर यासह सर्व मुद्रांक विक्रेता आणि दस्त लेखनिक सह संगणक परिचालक श्रीखंडे तसेच कार्यालयीन कर्मचारी प्रामुख्याने हजर होते.याप्रसंगी उपस्थित कर्मचारी व मुद्रांक विक्रेता तसेच दस्त लेखनिकांनी या निरोप समारंभात पदोन्नती प्राप्त कपले यांच्या कार्यकाळात कार्यालयामध्ये शिस्त निर्माण होऊन नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या व दस्तामधील होणाऱ्या चुका कमी झाल्याचे विचार व्यक्त करून सह दुय्यम निबंधक कपले यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com