संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-कोरोना कालखंडात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर मोफत धान्य वाटप करण्यात आले. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सामान्यांची दिवाळी गोड झाली आहे.
शहरातील भिम नगरातील आनंद अगुटलेवार आणि दुर्गेश ढोके यांच्या स्वस्त धान्य दुकानात नगर परिषद कामठी भाजप च्या माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किट चे वाटप आज पासुन सुरु करण्यात आले.यावेळी विक्की बोंबले,बादल कठाने, शानु ग्रावकर, जितेंद्र खोब्रागडे, बिरजू चहांदे उपस्थित होते.
दिवाळीसाठी राज्य सरकारच्या वतीने जाहीर केलेला आनंदाचा शिधा लोकांपर्यंत पोहचत आहे. दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून १०० रुपयांत 1 किलो रवा,1 किलो साखर,अर्धा किलो खाद्य तेल,अर्धा किलो चना डाळ, अर्धा किलो पोहा, अर्धा किलो मैदा या सहा वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारने केली आहे.स्वस्त धान्य दुकानदारा कडील आय पॉस मशीन कोणत्याही तांत्रिक कारणाने बंद पडल्यास, ऑनलाइन सर्वर नसल्यास ऑफ लाईन पद्धतीने आनंदाचा शिधा किट वितरण करण्यात यावे, शेवटच्या लाभार्थीला किट वितरण केल्या शिवाय धान्य दुकान बंद करू नये असे शासन निर्देश असल्याचे भाजपा पदाधिकारी संध्या रायबोले यांनी सांगितले.
या वाटपा दरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.लाभार्थ्यांकडून या योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.