कामठीत आनंदाचा शिधा दिवाळी किट वितरण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  ऑकटोबर कोरोना कालखंडात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर मोफत धान्य वाटप करण्यात आले.

त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सामान्यांची दिवाळी गोड झाली.

कामठी शहरातील शशिकांत जैस्वाल यांच्या स्वस्त धान्य दुकानावर नगर परिषद कामठी चे विरोधी पक्ष नेते लालसिंग यादव,भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किट चे वाटप करण्यात आले.

दिवाळीसाठी राज्य सरकारच्या वतीने जाहीर केलेला आनंदाचा शिधा लोकांपर्यंत पोहचत आहे. दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून १०० रुपयांत 1 किलो रवा,1 किलो साखर,1 किलो खाद्य तेल,1 किलो चना डाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारने केली आहे.स्वस्त धान्य दुकानदारा कडील आय पॉस मशीन कोणत्याही तांत्रिक कारणाने बंद पडल्यास, ऑनलाइन सर्वर नसल्यास ऑफ लाईन पद्धतीने राशन किट वितरण करण्यात यावे, शेवटच्या लाभार्थीला किट वितरण केल्या शिवाय धान्य दुकान बंद करू नये असे शासन निर्देश आहेत असे भाजपा महामंत्री उज्वल रायबोले यांनी सांगितले.

या वाटपादरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.लाभार्थ्यांकडून या योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असून समाधान व्यक्त करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

' युवा चेतना मंच ' तर्फे रनाळा येथे किल्ला तयार करून दिला संदेश

Sun Oct 23 , 2022
नागपूर :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास इतरांना कळावा या उद्देशाने दरवर्षी युवा चेतना मंच तर्फे किल्ला तयार करण्यात येतो. युवा चेतना मंच ने आपली ही पंरपरा कायम ठेवत प्रा. पराग सपाटे यांच्या घरी आदर्श नगर येथे किल्लयाची प्रतिकृती तयार करण्यात आली . प्रा. पराग सपाटे मागील दहा बारा वर्षा पासून खंड न पाळता आपल्या घरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com