‘ युवा चेतना मंच ‘ तर्फे रनाळा येथे किल्ला तयार करून दिला संदेश

नागपूर :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास इतरांना कळावा या उद्देशाने दरवर्षी युवा चेतना मंच तर्फे किल्ला तयार करण्यात येतो. युवा चेतना मंच ने आपली ही पंरपरा कायम ठेवत प्रा. पराग सपाटे यांच्या घरी आदर्श नगर येथे किल्लयाची प्रतिकृती तयार करण्यात आली . प्रा. पराग सपाटे मागील दहा बारा वर्षा पासून खंड न पाळता आपल्या घरी शिवकालीन किल्ला तयार करत असतात . याप्रसंगी कामठी निधी अर्बन बैंक चे संचालक नितीन ठाकरे , सी.आर.पी.एफ चे सेवानिवृत्त सैनिक शेषराव अढाऊ , जेष्ठ नागरिक विजय टाकभवरे , रमेश चिकटे , दिंव्याग सस्थेचे अध्यक्ष बाँबी महेंद्र यांच्या हस्ते किल्ल्याची विधिवत पुजन करून ,शिवस्तुती घेऊन किल्ले प्रदर्शनी ची सुरुवात करण्यात आली . किल्ला तयार करण्याकरीता प्रा.पराग सपाटे, प्रथम सपाटे, स्वरीत सपाटे यांनीअथक मेहनत घेतली. लहान मुलांना महाराजांचा इतिहास कळावा महाराजांच्या गड-किल्ल्यांची माहिती व्हावी ,स्वराज ची माहिती व्हावी या उद्देशानेच हे किल्ले तयार करण्यात येते .बालक हे किल्ले तयार करताना महाराजांचा इतिहास समजून घेण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करतात याच उद्देशाने या किल्ल्यांची निर्मिती दरवर्षी युवा चेतना मंच करत असते परिसरातील बालकांनी मोठ्या उत्साहाने या किल्ला निर्मितीत सहकार्य केले . ह्या किल्ल्याला बघण्याकरीता परिसरातील बालकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. याप्रसंगी अक्षय खोपे यांनी बालकांना शिवाजी महाराजांचा इतिहासावर माहिती प्रदान केली .याप्रसंगी मयूर गुरव , प्रदीप सपाटे , अमोल नागपुरे डॉ निखिल अग्निहोत्री , कुणाल सोंलकी , भूषण ढोमणे आदी याप्रसंगी उपस्थित होते .

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com