संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 19:-समाजात अनेक सण , उत्सव आनंदात साजरे केले जातात यापैकीच एक सण म्हणजे शब-ए-बारात.
शब-ए-बारात म्हणजे पूर्वजांचे स्मरण . या रात्री मुस्लिम बांधव आपल्या चुकांची कबुली अल्लाहकडे देतात आणि भविष्यातील सुख, शांती, यश, समृद्धी यांसाठी प्रार्थना करतात. शिय्या आणि सुन्नी अशा दोन्ही पंथातील बांधव ही ‘शब-ए-बारात’ ची रात्र साजरी करतात. सर्वसाधारण बोली भाषेत याला शब-ए-बारात असे म्हटले जात असले, तरी वास्तविकपणे याला ‘शब-ए-बराअत’ असे म्हटले जाते. काल शुक्रवारी 18 मार्च ला कामठी तालुक्यात शब-ए-बारात पर्व साजरा करण्यात आला.
मुस्लिम समाजातील चार पवित्र रात्रीपैकी शब-ए -बारात ही सुदधा एक पवित्र रात्र असल्याची मान्यता आहे.आशुरा ची रात, शब-ए-मेराज, शब -ए-कद्र, शब-ए-बारात अशा या चार पवित्र रात्री आहेत. इस्लाममध्ये या रात्रीला अनन्य साधारण महत्त्व असते. शब-ए-बारात च्या रात्री करण्यात येणारी प्रार्थना आणि योग्य मागणी अल्लाह नक्कीच पूर्ण करतो. या रात्री मुस्लिम बांधवांवर अल्लाह कृपा करतो, अशी मान्यता आहे. या रात्री वर्षभर केलेल्या गुन्ह्यांची कबुली अल्लाहकडे दिली जाते आणि केलेल्या चुकांची माफी मागितली जाते. या दिवशी मुस्लिम बांधवांच्या चुकांचा हिशेब केला जातो आणि त्यांच्या नशिबाचा निर्णय होतो, असे सांगितले जाते. शब ए बारातच्या रात्री मुस्लिम बांधव केवळ आपल्या गुन्ह्यांची कबुली देत नाहीत, तर आपल्या पूर्वजांचे स्मरणही करतात. यासाठी मुस्लिम बांधवांनी कामठी च्या मुस्लिम समाजबांधवांनी कब्रस्तानात जाऊन पूर्वजांना स्मरण केले.
कामठी तालुक्यात शब ए बारात पर्व साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com