संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन उदघाटन होणार
कामठी :- अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक विकसित करण्याचे नियोजित आहे.त्यानुसार ऑगस्ट 2023 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारा देशातील 1200 रेल्वे स्टेशन च्या कायापालट कामाचा उदघाटन करण्यात आले. ज्यामध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडल चे गोंदिया,वडसा व चांदाफोर्ट या 3 रेल्वे स्थानकाचा ही समावेश होता.तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ अधिनस्थ असलेले उर्वरित 12 रेल्वे स्थानकात कामठी रेल्वे स्थानकासह राजनांदगाव, डोंगरगढ, बालाघाट,सिवणी, नैनपूर, मंडला फोर्ट,छिंदवाडा,आमगाव,भंडारा रोड,तुमसर रोड तसेच सुभाषचंद्र बोस इतवारी रेलवे स्टेशन च्या आधुनिकिकरन कायापालट कामाचा उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने उदघाटन होणार आहे.यासाठी केंद्र सरकार कडून आवश्यक त्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार कामठी रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन उदघाटन होणार असल्याची माहिती रेल्वे स्टेशन प्रबंधक सुरेश पाल तसेच रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य बबलू तिवारी व प्रेम शर्मा यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरातील रेल्वे प्रवाशांना सर्वोत्तम रेल्वे सेवा देता यावी म्हणून रेल्वे चे जाळे विणले जात आहे. कामठी रेल्वे स्थानकाचा कायापालटासाठी 7 कोटी 66 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे.त्यामुळे अत्याधुनिक सोयी-सुविधांसह कामठी रेल्वे स्थानक तयार करण्यात येणार असल्याची माहिती कामठी रेल्वे स्टेशन प्रबंधक सुरेश पाल यांनी दिली तसेच कामठी रेल्वे स्टेशन चा समावेश अमृत भारत योजना मध्ये केल्याबद्दल कामठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य बबलू तिवारी, प्रेम शर्मा,लाला खंडेलवाल आदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ,रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, वस्त्र राज्य मंत्री दर्शना जरदोश, मुख्यमंत्री एकणाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यांचे आभार मानले आहे.
अमृत भारत स्टेशन योजना एक दूरदर्शी उपक्रम आहे.. कामठी रेल्वे स्टेशन कायापालट प्रकल्पासाठी 7 कोटी 66 लक्ष रुपये मंजूर झाले असून यामध्ये रेल्वे स्टेशन परिसराचा विकास,उद्यान व भुदृश्य ,स्टेशन बिल्डिंग चा नवीन आकर्षित स्वरूप, कार पार्किंग ची सुविधा,एक हाई मास्ट लाईट,दोन लिफ्ट,काँनफोर्स विकास,आकर्षित पोर्च,भुवनेश्वर मॉडेल शौचालय,दहा सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा विकास करण्यात येईल. तेव्हा 26 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या कामठी रेल्वे स्थानकाच्या कायापालट कामाच्या ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी कामठी रेल्वे स्थानकात उपस्थित राहण्याचे आवाहन स्टेशन प्रबंधक सुरेश पाल यांनी केले आहे.