भंडाराच्या खून प्रकरणातील दोन आरोपीना कामठीतून अटक..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 18 :-भंडारा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोंडेगाव वनविभाग आगारातील जंगल शिवारात एका अनोळखी इसमाचा खून करून पुरावा नष्ट केलेला मृतदेह आढळल्याची घटना 6 एप्रिल ला निदर्शनास आली असता सदर खून प्रकरणाचा पर्दाफाश करण्याहेतु सदर मृतदेह हा नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका मिसिंग प्रकरणातील स्पष्ट झाले. या खून प्रकरणातील दोन आरोपी हे नागपूर चेच रहिवासी असून पोलिसांच्या अटकेबाहेर होते.मात्र आज हे दोन्ही आरोपी कामठी ला येत असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पिल्ले,राजू टाकळकर तसेच भंडारा पोलिसांना कळताच पोलिसांनी सापळा रचून यशस्वीरीत्या धाड घालून बडा पुलियावरून अटक करण्याची कारवाही आज सायंकाळी पाच दरम्यान केली असून दोन्ही आरोपीविरुद्ध भादवी कलम 302,201 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.अटक आरोपीचे नाव शेख आतीफ रा.शांतीनगर नागपूर तसेच फैजाण खान रा हिंगणा नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शांतीनगर रहिवासी तन्नू उर्फ तन्वीर नामक तरुण मागील पंधरा दिवसापासून बेपत्ता होता.यावरून घरमंडळींनी शांतीनगर पोलीस स्टेशन ला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मिसिंग ची तक्रार ची नोंद केली.मात्र हे मिसिंग नसून चक्क खून केलेल्या अवस्थेत मृतदेह भंडारा येथील गोंडेगाव च्या जंगलात आढळला.सदर प्रकरणाची सखोल चौकशी करीत आरोपीचा शोध लावून आरोपीना अटक करण्यात भंडारा तसेच नविन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून खून प्रकरणांचे खरे रहस्य लवकरच उघडकीस होणार असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com