संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-अमृत भारत स्टेशन अंतर्गत पुनर्विकासासाठी कोटी रुपयांचा निधी
कामठी :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील रेल्वे स्थानकाचा सर्व सोईयुक्त विकास व्हावा यासाठी रेल्वे मंत्रालय अंतर्गत देशातील रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवित आहे.त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने देशभरातील 1 हजार 309 रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करीत रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला असून त्यात महाराष्ट्र राज्यातील 123 रेल्वे स्थानकाचा समावेश आहे तर नागपूर रेल्वे मंडळातील 15 रेल्वे स्थानकाचा समावेश आहे तर या अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत कामठी रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे . या रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे.यातून कामठी शहराला शोभेल असे रेल्वे स्टेशन निर्माण होणार आहे.
या योजने अंतर्गत कामठी रेल्वे स्टेशन च्या पुनर्विकास अंतर्गत स्थानक परिसरातील परिभ्रमण क्षेत्र विकास, सुनियोजित आणि उत्तम दुचाकी,चारचाकी पार्किंग,निसर्गरम्य गार्डन,स्टेशन कार्यालयाचे परिसराचे नूतनीकरण, स्थानकात प्रवेश करण्यासाठी उचित योग्य दरवाजे,मार्णिका,स्थानकावर प्रतिक्षागृहाची उभारणी,स्थानकातील अंतर्गत रचनेत सुधारणा, आकर्षक असे उंच मुख्य दर्शनी भाग,स्थानकाच्या सभोवताली व दर्शनी भागात रोषणाई आदी कामे होणार आहेत.