२६/११च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना कामठी पोलिसातर्फे आदरांजली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मुंबईमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी, जवान व कर्मचाऱ्यांना कामठी पोलिस दलाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे व गुप्त विभागाचे अखिलेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक आदरांजली वाहण्यात आली.

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी, कमांडो, होमगार्ड व नागरिक अशा १७५ जणांना प्राण गमवावे लागले होते..या आठवणीला उजाळा देत कामठी पोलीस विभागातर्फे शहीद पोलिसांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक भातकुले,पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे, पोलीस उपनिरीक्षक आठवले, पोलीस उपनिरीक्षक पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे, प्रीती मोटघरे , यासह आदी पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय संविधान उद्येशिकेचे उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांच्या उपस्थितीत सामुहिक वाचन

Sun Nov 26 , 2023
नागपूर :- संविधान दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयात भारताच्या संविधान उद्येशिकेचे उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांच्या उपस्थितीत वाचन केले. संविधान उद्येशिकेच्या सामुहिक वाचन कार्यक्रमावेळी आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकेचे वाचन संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भारताच्या संविधान उद्येशिकेचे तहसीलदार स्नेहलता पाटील यांच्या उपस्थितीत वाचन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com