संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी नगर परिषद ला मिळणार 75 लक्ष रुपयांचे बक्षीस
कामठी :- माझी वसुंधरा 4.0अभियान अंतर्गत कामठी नगर परिषद ने उत्कृष्ट कामगिरी केली असून मूल्यमापन करून निवड करीत गुणानुक्रम देत घोषित केलेल्या निकालानुसार विभागस्तरावर नागपूर विभागातील कामठी नगर परिषद ला 11 व्या गुणानुक्रमाणे मानांकित करून 50 लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत पृथ्वी,वायू, जल,अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान ‘हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर 2020 ला राबविण्यास सुरुवात झाली. त्यानुसार माझी वसुंधरा अभियान 4.0 हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामठी नगर परिषद मध्ये 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत राबविण्यात आले तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातही राबविण्यात आले.यात माझी वसुंधरा अभियान 4.0साठी डेस्कटॉप मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापणासाठी गुण ठेवण्यात आले होते. त्यानुसार गुणांक देऊन केलेल्या गुणानुक्रम नुसार नागपूर विभागातील कामठी नगर परिषद ला विभागस्तरावर 11 व्या क्रमांकाने मानांकित करून 75 लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
-संदीप बोरकर,मुख्याधिकारी नगर परिषद कामठी
–/माझी वसुंधरा अभियान 4.0अंतर्गत कामठी नगर परिषद ने सहभाग नोंदवीत उत्तम कामगिरी करीत कामठी नगर परिषद आदर्श ठरली व विभागस्तरावर निवड झाली.त्यानुसार कामठी नगर परिषदला 75 लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर झाले असून जाहीर झालेल्या बक्षीस रकमेचे विनियोग शासनाच्या कार्यपद्धतीनुसार करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच शासन नियमानुसार प्रत्यक्ष कार्यवाहिला सुरुवात करणे यासाठी कामठी शहरातील नागरिकांनी विशेष सहकार्य केले व माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य केले त्याबद्दलनागरिकांचे तसेच कार्यालयीन अधिकारी कर्मचारी चे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो असेच सहकार्य पुढेही राहील अशी अपेक्षा करतो असे मत मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.