संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादर झेंडा परिसरातून दोन टाटा एस वाहनात अवैधरित्या सात गोवंश जनावरे निर्दयतेने कत्तलीसाठी वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच सदर दोन्ही वाहनावर धाड घालून कत्तलीसाठी जाणारे गोवंश जनावरे ताब्यात घेत जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही काल दुपारी 3 दरम्यान केली असून या धाडीतून जनावरे वाहून नेणारे टाटा एस क्र एम एच 36 ए ए 3962 व टाटा एस वाहन क्र एम एच 36 ए ए 3913 दोन्ही वाहने मिळून किमती 10 लक्ष रुपये व सात जनावरे 1 लक्ष 40 हजार रुपये असा एकूण 11 लक्ष 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.अटक आरोपी मध्ये अतुल कावळे वय 28 वर्षे रा मोहाडी जिल्हा भंडारा,चंद्रशेखर हेडाऊ वय 38 वर्षे रा मोहाडी जिल्हा भंडारा चा समावेश आहे.तसेच जप्त सात गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे,रवींद्र गावंडे,विवेक दोरसेटवार, रमेश बंजारा,शारीक खान यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.