पत्रकार पुत्राची डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने घरातील राहत्या खोलीत अज्ञात कारणावरून डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृतकाचे नाव आयुष अजय त्रिवेदी वय 30 वर्षे रा ऑरेंज सिटी टाऊनशीप कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नसल्याची प्राथमिक माहिती असली तरी या आत्महत्या प्रकरणाने विविध प्रश्नांना पेव फुटले आहे.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.तर मृतकाच्या पाठीमागे आई,वडील व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाची ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची माहिती

Tue May 30 , 2023
मुंबई :- मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभर महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या सर्व मतदारसंघात प्रवास करणार असल्याची माहिती भाजपा चे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!