पीक पाहणीत अडचण असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा – निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे

भंडारा :- नैसर्गिक आपत्ती पीकाची नुकसान भरपाई,पीक कर्ज या सुविधंसाठी रब्बी हंगाम 2024-25 स्वत:शेतकऱ्यांनी आपला पीक पेरा नोंदवायचा आहे.पीकांचे नोंद E-peek Pahani ई-पीक पाहणी DCS डिसीएस मोबाईल ॲपद्वारे 15 जानेवारी,2025 पर्यत शेतकऱ्यांनी स्वत : नोंद करुन घ्यावे.शेतकऱ्यांनी केलेली नोंद स्वयंप्रमाणीत मानण्यात येणार आहे.पीकाची नोंद घेत असतांना चुकिची नोंद असल्यास स्वत:शेतकऱ्यांना 48 तासात दुरस्ती करता येईल. पीक कर्ज,पीकाची नुकसान भरपाई इत्यादी सुविधा लाभ आपल्या 7/12 वर पीकाची नोंद केल्याने शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी विहित कालावधीत 1 डिसेंबर,2024 ते 15 जानेवारी,2025 पर्यत विहित वेळेत पीक पाहणी पूर्ण करावी,असे जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांनी जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवाना आवाहन केले आहे.पीक पाहणी करताना अडचणी आल्यास 02025711712 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावे,असे निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्र महसुल विभागानी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बालसंगोपन योजनेसाठी आधार सिडींग करा - महिला व बालविकास विभाग

Thu Nov 28 , 2024
भंडारा :- महिला व बाल विकास विभागातर्फे क्रांतीज्यती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत असून योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी.बी.टी.द्वारे देण्यात येतो.योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे बॅक खाते आधार सिडींग करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या 10 वर्ष वयोगटातील बालकांचे त्यांच्या पालकांसोबतच संयुक्त बॅक खाते उघडून बँक खात्याशी बालकांचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com