संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 3:- दोन वर्षाच्या कोरोनामुक्त निर्बंधमुक्ती नंतर दरवर्षी प्रणाने यावर्षी सुद्धा श्री झुलेलाल सिंधू सेवा समिती व पूज्य सिंधी पंचायत कामठी-कन्हानच्या वतीने काल 2 एप्रिल ला कामठीत श्री झुलेलाल जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त कांटी भवन येथील सिंधू भवन स्थित मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळच्या वेळी शहरातील प्रमुख मार्गावरुन शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्राही शहरवासियांसाठी आकर्षण ठरली. शोभायात्रे दरम्यान श्री गणेश भगवानचे रथ,झुलेलाल जयंती रथ, नृत्य मंडली द्वारा नृत्य सादर करीत सजीव देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले. या उत्सवात आमदार टेकचंद सावरकर, विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, समाजसेवक अज्जू अग्रवाल, लाला खंडेलवाल आदींनी उपस्थिती दर्शविली होती.
जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अशोक चावला,डॉ मनोज गुरुदासानी,सुनिल खानवाणी, संजय चावला, विनोद वाधवाणी, डॉ मनीष दिपाणी, महेंद्र पंजवाणी, डॉ राजेश दिपाणी, धरम पारवाणी, डॉ अनिल मंगतानी, अमर चावला,प्रदीप उदासी, प्रकाश सुखीजा यांच्यासह समाजबांधवांन
झुलेलाल जयंती उत्साहात साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com