संदीप बलवीर,प्रतिनिधी
मरणोपरांत केले वडिलांचे अवयव व देहादान
विश्वशांती सामाजिक न्याय संस्थेचा पुढाकार
नागपूर :- रुई खैरी ग्रामपंचायत चे माजी सरपंच, बुटीबोरी मराठी पत्रकार संघांचे सदस्य, पत्रकार संजय जीवणे यांचे वडील अण्णाजी पांडुरंग जीवणे (९२) यांचे शुक्रवार दिनांक ०६ ऑक्टो ला रात्री १० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे त्यांनी लगेच विश्वशांती सामाजिक न्याय संस्था चे सचिव चंद्राबाबू ठाकरे यांच्याशी संपर्क केला व सांगितलं की मला माझ्या वडिलांचे अवयव व देहदान करायचे आहे.चंद्राबाबूनी एका क्षणाची उसंत न घेता नागपूर मेडिकल येथील देहादान समिती सदस्य प्रा डॉ सुशील मेश्राम यांच्याशी संपर्क केला. लगेच महात्मे नेत्रालय,नागपूर येथून डॉक्टरांची चमू रुई खैरी येथे रात्री १:०० वाजता आली व घरीच त्यांच्या वडिलांच्या डोळ्याचे कारनिया च्या ऑपरेशन करून ते आपल्या सोबत घेऊन गेले. त्यानंतर लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा येथून शरीर रचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ दीपा ओंकार यांच्या सहकार्याने सकाळी ११:३० वाजता त्यांच्या वडिलांचे शव वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरच्या शिक्षणासाठी देहदान करण्यात आले.
महत्वाची बाब अशी कि,मानवी शरीर हे नश्वर आहे. त्याला मृत्यू नंतर जाळले किंवा मातीत पुरले तरी त्याचा मानवी समाजाला काहीही उपयोग होत नाही. सोबतच ते जाळले किंवा मातीत पुरले तरी पर्यवारणाचाच ऱ्हास होतो. मातीत पुरले तर त्या जागे सोबत आसपासचा परिसर नाशवंत होतो तर जाळून टाकल्यास जाळण्यासाठी जवळपास दोन वृक्षाचा बळी द्यावा लागतो. त्याच सोबत वातावरणात धुर पसरून वायू प्रदूषण होते ते वेगळेच.
मानव हा समजशील प्राणी आहे. जिवंत असतांना त्याला समाजाचे देणे हे असतेच. परंतु आजच्या स्वार्थी व मतलबी जगात बहुतांश व्यक्ती हे समाजाप्रती असलेले आपले देणे वीसरून मी, माझी बायको, माझा परिवार, माझे घर व माझे काम यातच गुरफटलेला दिसून येतो.अशातच आपण जिवंतपणी कोणाच्या कामी तर येत नसतोच त्याचप्रमाणे मरना नंतर ही आपले शरीर जाळून किंवा मातीत पुरून त्याला पंचमहाभूतांत विलिन केले जाते.त्यामुळे मृत्यू नंतरही आपन कोणाच्याच उपयोगाचे होतं नाही. याच बाबीचे मर्म काळजात बाळगत रुई खैरी येथील एका सामान्य कुटुंबातील संजय अण्णाजी जीवणे या व्यक्तीने समाजाच्या, रितिरिवाजाच्या प्रवाहतून बाहेर पडत मृत्युनंतर आपल्या जीवनदाता वडिलांचा मृत्युदेह व डोळे दान करून समाजासमोर एक आगळी वेगळी बाब करून दाखविण्याचे धाडस केले.
आज देशात अनेक जण अनेक व्याधिने ग्रस्त आहे. अनेकांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. तर अनेक जण दृष्टीहीन आहेत. हे जग किती सुंदर आहे? आपली मुलगी कशी दिसते? पाण्याचा रंग कोणता? आदी बघता येत नाही. अशा दृष्टीहीन लोकांना मरणोपरांत डॊळे दान केल्याने तेही सुंदर जग बघू शकतात. हेच काय तर देशात दरवर्षी लाखो विध्यार्थी डॉक्टर बनून बाहेर पडतात परंतु त्यांना संशोधन करण्याकरिता मृत देह उपलब्ध नसते. त्यामुळे ते आपले संशोधन योग्य प्रकारे करू शकत् नाही. देशात एक लाख डॉक्टरांना संशोधन करण्याकरिता दरवर्षी फक्त २८ मृत देह उपलब्ध होतात ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे शरद बलवीर व संजय जीवणे यांचा वारसा जपत समाजातील इतर व्यक्तीनेही मृत्यू नंतर त्यांचे डॊळे दान केल्याने दोन अंध व्यक्ती हे सुंदर जग बघू शकेल तर त्यांच्या मृत शरीरावर संशोधन करून उत्तम असे डॉक्टर तयार होणार असल्याने सामाजितील बहुतांश लोकांनी मृत्युंनंतर आपल्या आप्त स्वकी्यांचे अवयवदान व देहादान करावे असे मत बुटीबोरी मेडिकल अशोसिशन चे डॉ भीमराव मस्के यांनी व्यक्त केले.
विशेष बाब अशी कि, टाकळघाट येथील समाजसेवक व पुरोगामी विचार मंच चे मार्गदर्शक शरद बलवीर यांच्या आईचे सुद्धा मरणोपरांत देहादान व अवयवदान करण्यात आले असून विश्वशांती सामाजिक न्याय संस्था, चंद्राबाबू ठाकरे व प्रा.डॉ. सुशील मेश्राम यांच्या प्रयत्नानेच अगदी महिन्याभरातच बुटीबोरी, टाकळघाट परिसरात दोनदा देहदान व अवयवदान करण्यात आले आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मुजीब पठाण, विश्वशांती सामाजिक न्याय संस्थेचे अरविंद नारायने, पीपल्स पँथरचे बुटीबोरी शहर अध्यक्ष राजू नगराळे, सचिव सिद्धार्थ चहांदे, पत्रकार सुभाष राऊत,चंदू बोरकर,सुरेश रोहणकर, भीम आर्मीचे नंदेश वाघमारे, भीम पँथरचे सुमित कांबळे, संजय भुमरकर, विनोद मुन, समाजसेवक खुशाल मांढरे व शेकडो नागरिक उपस्थित होते.