जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहिमेचे सोमवारी उदघाटन

चंद्रपूर | शहरातील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना सोमवार, दि. ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचे उदघाटन सोमवारी सकाळी 10 वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले मनपा शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

ही लसीकरण मोहीम शहरातील १६८ शासकीय आणि खासगी शाळा आणि १८५ अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार असून, एकूण ७६ हजार २५ मुलांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी दिली.

जपानीज एन्सेफलिटीस आजाराचा मृत्यूदर तीस टक्के आसपास आहे. आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुलांच्या भविष्यासाठी कवच-कुंडल होण्याच्या दृष्टीने लस घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

१५ वर्षावरील लसीकरणाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

Sun Jan 2 , 2022
नागपूर – महानगरपालिकेतर्फे १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींचे लसीकरण सोमवार ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मोहिमेचा शुभारंभ महापौर श्री दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी (३ जानेवारी) सकाळी १०.३० वाजता राजकुमार गुप्ता समाजभवन, बजेरिया येथे होईल. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com