जैन साध्वी प्रा. मंगल प्रज्ञा यांनी घेतली राज्यपालांची भेट

– व्यसनमुक्तीतून सशक्त महाराष्ट्र निर्मितीबाबत चर्चा

मुंबई :- युवकांमधील वाढती व्यसनाधीनता, ड्रग्सचा वापर तसेच मोबाईल फोनचा अतिवापर या गंभीर समस्या असून व्यसनमुक्तीतून सशक्त महाराष्ट्र निर्मिती करण्याबाबत जैन तेरापंथ समाजातर्फे होत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे काढले.

जैन तेरापंथ समाजाचे आचार्य महाश्रमण यांच्या शिष्या साध्वी प्रा. मंगल प्रज्ञा यांनी अन्य साध्वी तसेच अणुव्रत विश्व भारतीच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल राधाकृष्णन यांची शनिवारी (दि. ४) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

आपण तामिळनाडूमध्ये कार्य करीत असताना संपूर्ण देशाला ड्रगमुक्त करावे, देशातील पूर व अवर्षण समस्यांवर मात करण्यासाठी सर्व नद्या जोडण्यात याव्या, समान नागरी कायदा लागू करावा आदी मागण्यांसाठी १९००० किमी रथयात्रा काढली होते असे सांगून युवकांना व्यसनमुक्त करण्यासंदर्भातील सर्व उपक्रमांना आपला पाठींबा राहील असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिली.

यावेळी बोलताना साध्वी प्रा मंगल प्रज्ञा यांनी डिजिटल उपकरणे व मोबाईल फोनच्या होणाऱ्या अतिवापराबाबत देखील चिंता व्यक्त केली. मोबाईल फोनचा वापर मर्यादित करावा या दृष्टीने ‘डिजिटल डिटॉक्स’ उपक्रम सुरु केल्याचे तसेच ध्यानधारणेतून उन्नतीसाठी ‘मेडिटेट टू एलिव्हेट’ उपक्रम सुरु केल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. या उपक्रमांना शासनाने पाठबळ द्यावे अशी त्यांनी मागणी केली.

यावेळी जैन तेरापंथी महासभेचे सदस्य किशनलाल डगलिया, अणुव्रत विश्वभारतीचे महासचिव मनोज सिंघवी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राजकुमार चपलोत, सभेचे मुंबई अध्यक्ष मानेक धिंग, विनोद कोठारी, कुंदन धाकड आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आदिवासी समाजातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mon Jan 6 , 2025
– आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाह व्यापण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न -आदिवासी कल्याणाच्या सर्व उपक्रमांसाठी राज्यशासन भक्कमपणे पाठीशी – मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण नागपूर :- आदिवासींमध्ये उपजतच क्रीडा गुण असतात. त्याला स्पर्धात्मक वातारवण ,तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड देवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवासायीक खेळाडू घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!