– स्वत: पेन्सिल पोर्ट्रेटचे स्केच तयार करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नागपूर :-अभ्यासू, स्वच्छ प्रतिमा, उत्तम संसदपटू, विदर्भवादी आताचे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे नागपुरचे विकास पुरूष म्हणून त्यांची ओळख आहे. नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि आता उप मुख्यमंत्री असा यशाचा टप्पा गाठणारे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस आज राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. देशाच्या राजकारणात महाराष्ट्राला अग्रस्थानी नेऊन विकासाभिमूख कार्य करणारे उपराजधानीचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 54 वाढदिवसाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी अनोखी भेट दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवासचे औचित्य साधून जयदीप कवाडे यांनी स्वत: 15 दिवस हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच तयार केले. स्केचमध्ये जयदीप कवाडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मोठे सुंदर चित्र तयार केले. या स्केचमध्ये आदरणीय देवेंद्र जी…शत: आयुष्य व्हा असे हृदयस्पर्शी स्लोगन देत त्यांनी शुभेच्छा दिल्या. जयदीप कवाडे यांना राजकारणापलीकडे त्यांचा चित्र काढण्याचा छंद आहे. हा छंद जोपासून जयदीप कवाडे आपल्या आपुलकीच्या माणसांना पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढून भेट देतात. महायुतीचे मुख्य नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात पीपल्स रिपब्लिकन पार्टी त्यांच्यासोबत प्रामाणिक पणे घटक पक्ष म्हणून सोबत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मनमिळावू आणि प्रामाणिक राजकारणी म्हणून ते राज्यासह देशात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अभ्यासूपणाबरोबरच स्वच्छ प्रतिमा ही देवेंद्र त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांना सर्वच पक्षासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार हा त्यांना मोठ्या मनाचा नेता म्हणून संबोधतो. खुद्द देवेंद्र फडणवीस हे विदर्भासह राज्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी राजकारणात शत्रुलाही मित्र कसे बनवता येते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांच्या वाढदिवसाला अनोखी भेट देण्याच्या उद्देशाने जयदीप कवाडे यांनी त्यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच तयार करून त्यांना भेट दिले. याप्रंसी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले हुबेहुब चित्र पाहून ते खूप भारावले आणि जयदीप कवाडेंचे विशेष कौतुक ही केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व जयदीप कवाडे यांचे आभार मानले.