उपराजधानीत ‘आप’च्या महा-परिवर्तन सभेला तुफान गर्दी
नागपूर :- महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर संत्रा उत्पादक भाग म्हणुन ओळखला जातो. परंतु देशात फूट पाडणारे लोक देखील नागपुरातीलच आहेत, हे खेदाने नमूद करावे लागते. देणाच्या एकात्मतेत आणि अखंडतेत फूट पाडणाऱ्या शक्तींना आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलीय, असा शंखनाद दिल्ली विधानसभेच्या उपसभापती तथा आम आदमी पार्टीच्या नेत्या राखी बिडलानी यांनी केला.
नागपुरातील बेझनबाग मैदानावर आयोजित भव्य जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ‘आप’चे महाराष्ट्र सहप्रभारी गोपाल ईटालिया, प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे, अजित फटके, सीमा गुत्ते, मनीष मोदक, धनंजय शिंदे, संदीप देसाई, शाहिद जाफरी, रोशन डोंगरे,शैलेश गजभिये, ऋषभ वानखेडे, नरेश महाजन, प्रदीप पवनीकर, सुषमा कांबळे,आदी उपस्थित होते. आपल्या भाषणात बिडलानी म्हणाल्या की, गोपाल ईटालिया यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पक्षाचे काम जोमाने सुरू आहे. नागपुरात सभा घेतल्यानंतर देश तोडणाऱ्यांच्या ‘हॅरीपॉटर’पर्यंत ही बाब नक्कीच पोहोचेल की ‘आप’ला आता महाराष्ट्रातही वाढता प्रतिसाद मिळत आहे. देश तोडण्यासोबत दडपशाही ही देखील अशा पक्षांची कार्यपद्धती आहे. सुरक्षा यंत्रणा, तपास यंत्रणांचा गैरवापर करून ईमानदारीने काम करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचे षडयंत्र असे पक्ष रचत आहेत. त्यांना आम्हाला सांगायचे आहे की, त्यांनी देशात फूट पाडण्याचे काम सुरू ठेवावे. आम्ही आम आदमी पार्टीच्या ‘झाडू’च्या मदतीने देश जोडण्याचे काम करीत राहु, असे बिडलानी यांनी नमूद केले.
राजकारणात कोणतही नेता किंवा राजकीय पक्ष परिवर्तन घडवू शकत नाही. केवळ सामान्य नागरीकच हा बदलाव घडवू शकतो. जातीपातीचे राजकारण बाजुला ठेवत नागरीकांनी अशा पक्षांना तडीपार करावे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाही बेरोजगारी, गरीबी, शहिदांची उपेक्षा, मूलभूत सुविधांचा अभाव, शिक्षणाचा अभाव, आरोग्य सुविधांचा अभाव, भ्रष्टाचार कायम आहे. अशांच्या हाती सत्ता सोपविल्याने कुणाचेही भले होणार नाही, उलट समाजाचा ऱ्हासच असे पक्ष करतील असे ठाम मत, राखी बिडलानी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल ईटालिया म्हणाले की, लोकांना देशात परिवर्तन हवे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमितून दीक्षा घेत मानवता आणि क्रांतीचा संदेश दिला, त्याच नागपूरच्या भूमीतून राजकीय क्रांती घडणार आहे. ‘आप’ संख्यात्मक दृष्टीने छोटा राजकीय पक्ष असेल परंतु राष्ट्रहिताचा सर्वांत व्यापक विचार करणारा पक्ष हा केवळ ‘आप’च आहे. आम आदमी पार्टी ही केवळ देशाच्या संविधानावर काम करते. दिल्ली व पंजाबमध्ये ‘आप’ने परिवर्तन घडवून दाखविले. तरुणाईला राजकारणात येण्याची सर्वाधिक संधी देणारी, सामान्य नागरिकांना सर्वाधिक संधी देणारा पक्ष हा आम आदमी पार्टीच असल्याचे ईटालिया यांनी आत्मविश्वासाने नमूद केले. अरविंद केजरीवाल आपला पक्ष पैसे किंवा बाहुबली नेत्यांच्या भरोश्यावर चालवत नाही, तर सामान्यांच्या जोरावर चालवितात, असेही ते म्हणाले.
प्रदेश संघटनमंत्री भूषण ढाकुलकर म्हणाले की, नागपूर केवळ संघभूमी नाही. नागपूर खऱ्या अर्थाने दीक्षाभूमी आहे. देशात काही लोक मनुस्मृती घेऊन चालत आहेत. परंतु आम आदमी पार्टीजवळ बाबासाहेबांनी दिलेले संविधान आहे आणि आजच्या घडीला मनुस्मृतीपेक्षा संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. देशाला विभाजित ठेवणाऱ्यांचा आजही वर्ण व्यवस्था जीवंत ठेवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. परंतु आम्ही समानतेच्या अधिकारासाठी लढत आहोत. जगात सावरकरांना मानणाऱ्यांची संख्या जेवढी नाही, तेवढी बाबासाहेबांची पूजा करणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे ‘आप’ केवळ संविधान आणि राष्ट्रहितासाठी काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
आम आदमी पार्टी कोणत्याही एका नेत्याची नाही, तर ती सामान्यांची पार्टी आहे. ज्या समाजाचा आवाज कुणीच ऐकत नाही, त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ‘आप’ करीत आहे. संविधान आणि राष्ट्रहित हे आम आदमी पार्टीसाठी सर्वांत आधी असल्याचे मत अजिंक्य कळंबे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘आप’चा प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्ता स्वार्थाविना देशासाठी काम करीत आहे. यापैकी कुणालाही सत्तेचा हव्यास नाही. प्रत्येकाला देशात परिवर्तन घडावे हिच ईच्छा आहे. ‘आप’ही अशाच लोकांना संधी देत आहे, ज्यांना खऱ्या अर्थाने बदलाव हवा आहे. कुणाचाही परिवार, काका, मामा, दादा, आई-वडिल राजकारणात नसलेल्या नव्या उमेदीच्या लोकांना ‘आप’ संधी देत आहे. राजकारणात स्वच्छ चारित्र्याचे, ईमानदार तरुण चेहरे यावे हिच आमची ईच्छा असल्याचे कळंबे म्हणाले. दिल्ली व पंजाबमध्ये जी क्रांती घडली ती जगाने पाहिली. आता देशात ही क्रांती घडवायची आहे. सभेच्या यशस्वीतेसाठी नागपूर शहर महासचिव श्याम बोकडे, संघटन मंत्री सोनू फटिंग,सोशल मीडिया अध्यक्ष रजत जीभकाटे, सचिन लोणकर विशाल वैद्य दीपक भातखोरे तेजराम शाहू विपिन कुर्वे अलका पोपटकर पुष्पा डाबरे सूचना गजभिये जॉय बागलकर गिरीश तीतरमारे हरीश वेळेकर वेळेकर संगीता भातो नामदेव कांबळी मोहन मांगर परिश्रम घेतले.
नागपुरातील सभेदरम्यान मोठ्या प्रमाणावर नागपूरकरांनी आम आदमी पार्टीत प्रवेश घेतला. यामध्ये कविता पाल गायत्री देशमुख सुनिता फुल झाले सिंधू कुकू हेमा वालदे सुरज वालदे अरविंद पांडे अरुणा माईंदे शगुन शेख शेहनाज शेख अमिदा बेगम सीमा शेख रुबीना विजय डोंगरे प्रगती टेंभुर्णी नितेश रंगारी यांचा समावेश आहे.