मुंबई :- अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अतिशय विचारपूर्वक व बराच अभ्यास करून विधीमंडळात पारीत करण्यात आला त्यावेळी सगळ्यांचाच विचार करण्यात आला होता त्यामुळे अंधश्रद्धा कायदा हिंदू विरोधात आहे असे म्हणणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली.
अंधश्रध्देमुळे काही लोकांची दुकाने बंद होणार असतील तर मला वाटत नाही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्दच करावा असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
अंधश्रद्धा कायदा हिंदूच्या विरोधात नाही तो सर्व धर्मात असलेल्या अंधश्रद्धेच्याविरोधात आहे त्यामुळे हिंदू विरोधी आहे असे कोण बोलू शकत नाही की धर्माच्या विरोधात अंधश्रद्धा आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
दिपक केसरकरांना शिवसेना व उध्दव ठाकरे यांनी मोठी संधी दिली होती. आता राष्ट्रवादीने शिवसेना फोडली की दिपक केसरकर आणि त्यांच्या कंपूने शिवसेना सोडली हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ‘चोराच्या उलट्या बोंबा’ अशा ज्या म्हणी आहेत ना त्या म्हणींचा अभ्यास दिपक केसरकर यांनी करायला पाहिजे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी काय चर्चा केली याबाबत आमच्याकडे त्याचा तपशील नाही तपशील आल्यावर प्रतिक्रिया देऊ असे जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.