महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं… उष्णतेमुळे या जिल्ह्यात जमावबंदी; कोचिंग क्लासेसवर निर्बंध

जळगाव :- महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील तापमान प्रचंड वाढले आहे. 40 अंश सेल्सियसच्या वर गेलेल्या तापमानात अंगाची लाहीलाही होत आहे. परंतु राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही शहरांमधील तापमान 45°c वर गेले आहे. यामुळे उष्मघाताचा धोका निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 45°c वर गेला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात २५ मेपासून 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जमाबंदीचे आदेश काढले आहेत. उष्णतेच्या लाट्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

धुळे शहराचा तापमानाचा पारा तब्बल 44 अंशाच्या पुढे गेला आहे. धुळ्यात 44.5°c तापमान झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून धुळे शहरात 40 अशांच्या पुढे तापमान आहे. वाढलेल्या तापमान मुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. हवामान विभागाने येत्या काळात अजून तापमान वाढणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या गोष्टींवर निर्बंध

* रोजगार हमीसह वेगवेगळ्या प्रकल्पाची कामे असल्यास मजुरांना सोबत घेऊन कडक उन्हात काम न करण्याच्या वेगवेगळ्या शासकीय विभागांना सूचना दिल्या आहेत.

* खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. पर्यायी व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

* कामाच्या ठिकाणी कामगारांना पुरेशे शेड तयार करणे, कुलर किंवा इतर साधने पुरवण्याची जबाबदारी संबंधित प्रतिष्ठान, कंपनी मालकांची राहणार आहे.

* दहा वर्षाखालील बालकांनी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बाहेर खेळू नये पालकांनी काळजी घ्यावी.

* दैनंदिन काम असल्यास रुमाल टोपी अशी आवश्यक खबरदारी घेऊन बाहेर पडावे. मुबलक पाणी प्यावे.

* उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तातडीने शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून उपचार करून घ्यावे.

Source by TV9

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं, तीन वर्षांच्या चिमुरड्याची प्रकृती गंभीर

Sat May 25 , 2024
नागपूर :- पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही अशीच घटना घडली आहे. नागपूरमध्ये शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतल्या चालकाने भरधाव वेगात तिघांना उडवण्यात आलं. मद्यधुंद अवस्थेत चालकाने ज्यांना उडवलं त्यातल्या तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या अपघाताबाबत काय सांगितलं?https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या चालकासह तिघांना ताब्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com