सिंचन महामंडळ : 6257 रिक्त पदासाठी बसपाचे शिष्टमंडळ भेटले

नागपूर :-विदर्भातील सिंचन विभाग व प्रकल्पमध्ये 56% रिक्त जागांमुळे सिंचन प्रकल्पाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना व सुशिक्षित बेरोजगारांना बसत आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने विनाविलंब रिक्त जागेवर पद भरती करावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी व विदर्भ प्रदेशचे इन्चार्ज एडवोकेट सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता यांची भेट घेऊन त्यांना संबंधित मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात वर्ग एक ते चार पर्यंतच्या 6257 रिक्त जागा असून त्यातील वर्ग 1 च्या 461, वर्ग 2 च्या 1586, वर्ग 3 च्या 3772, व 4 श्रेणी च्या 1453 इतक्या जागा रिक्त आहेत. अशा प्रकारची माहिती बसपाचे माहिती अधिकार कार्यकर्ते अंकित थुल यांनी मिळविली आहे. त्या रिक्त जागा त्वरित भराव्या अशी बसपाची तातडीची मागणी आहे.

शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश बसपा च्या सचिव रंजना ढोरे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, जिल्हा महिला आघाडीच्या सुरेखा डोंगरे, शहर प्रभारी विकास नारायणे, माजी मनपा सभापती गौतम पाटील, पश्चिम नागपूरचे अध्यक्ष भास्कर कांबळे, उपाध्यक्ष एडवोकेट वीरेश वरखडे, महासचिव अंकित थुल, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, पूर्व नागपूरचे महासचिव सचिन मानवटकर, भानुदास ढोरे, जनार्धन मेंढे, छाया सोमकुवर आदींचा प्रामुख्याने समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोरया फाउंडेशन आयोजित डान्स प्रतियोगिता आणि नऊवारी लई भारी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात

Fri Oct 13 , 2023
नागपूर :- नुकताच झालेला रविवारी 8 ऑक्टोंबर रोजी भाग्यलक्ष्मी हॉल उदय नगर रिंग रोड नागपूर येथे मोठ्या थाटामाटात साजरा झाला. याप्रसंगी प्रफुल्ला गिरडकर कार्यक्रमच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तसेच अध्यक्ष मुकेश रेवतकर होते, विशेष अतिथी मिसेस नागपुर प्रविना दाढे ह्या होत्या. कार्यक्रमांची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक मोरया फाउंडेशन च्या संस्थपिका रजनी चौहाण यांनी केले स्वरधारा या समूहातील अंध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com