‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सहव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) गेली सेहचाळीस वर्षे कार्यरत आहे. या महामंडळामार्फत चित्रपटांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. याचबरोबरच मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळामार्फत विविध अनुदान योजनाही राबविण्यात येत आहे. चित्रपटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी यंदा महामंडळ गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिल्म बाजारकरीता सहभागी होत आहे. या महोत्सवात कोणते चित्रपट सादर करणार आहेत, महोत्सवाचे वेगळेपण काय आहे, या उपक्रमासाठी महामंडळाने कशी तयारी व नियोजन केले आहे. याबाबतची माहिती महामंडळाचे पाटील यांनी ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार, दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Sat Nov 18 , 2023
– अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय सुरु करावे मुंबई :- आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!