‘दिलखुलास’ कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘लोकसभा निवडणूक २०२४’ या विषयी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची शनिवार दि.१३ एप्रिल आणि सोमवार दि. १५ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आदर्श आचारसंहिता, निवडणुकीचे कामकाज सुरळित करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली सर्व कार्यवाही, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था कार्यवाही, मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याविषयी सविस्तर माहिती स्वामी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ॐ महाकाली मंदिर कन्हान येथे घटस्थापनाने चैत्र महाकाली नवरात्री उत्सव

Fri Apr 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- नदीच्या पावन काठावरील ॐ महाकाली मंदिर सत्रापुर कन्हान येथे चैत्र शुक्ल पंचमी (दि.१३) एप्रिल ला घटस्थापना करून धार्मिक कार्यक्रमासह चैत्र नवरात्री उत्सव साजरा करण्यात येईल. ॐ महाकाली सेवा समिती सत्रापुर कन्हान व्दारे दरवर्षी प्रमाणे चैत्र शुक्ल पंचमी शनिवार (दि.१३) एप्रिल २०२४ ला सकाळी १० वाजता कन्हान नदीच्या पावन काठावरील प्रसिध्द ॐ महाकाली मंदिर सत्रापुर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com