नागपुर – दिनांक 25.03 .22 ते दि. 26.03.22 दरम्यान फिर्यादी हरीश नारायणराव गोन्नाडे, वय 40 वर्ष, रा. लाल ईमली गल्ली धारस्कर रोड ईतवारी पो.स्टे. तहसील हद्दीत आपली टू व्हीलर होंडा अॅक्टीव्हा 3 जी गाडी नंबर एम.एच.49 /ए.बी. – 8446 ही घटनास्थळी लॉक करून आपले घरी आराम करणे करीता गेले व दूस-या दिवशी गाडी ठेवलेल्या ठीकाणी आले असता त्यांना ठेवलेल्या ठिकाणी गाडी दिसून आली नाही त्यांनी आजू-बाजूला विचारपुस केली तसेच परिसरात शोध घेतला गाडी मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात चोरटयाने गाडी चोरून नेली असावी. असे फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. तहसिल येथे गुन्हा अप क्र 255/22 कलम 379 भा.द.वि.प्रमाणे नोंद करण्यात आला. सदर गुन्हयात आरोपी व चोरीस गेलेला वाहनाचा शोध घेत असता टांगा स्टान्ड चौक येथे एक ईसम पांढ-या रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्र एमएच -49/एबी – 8446 नी संषयीतरित्या जातांनी दिसून आला त्याला थांबण्याचा ईशारा केला असता तो पोलीस स्टॉफला पाहून पळु लागला त्यास गांधीपुतळा चौक येथे स्टॉफच्या मदतीने घेराव घालून थांबविले व सदर गाडी बद्दल विचारपुस केली असता उडवा-उडविचे उत्तर देवू लागला त्याला त्याचे नांव पत्ता विचारले असता त्यांने आपले नांव – रिशभ श्याम असोपा, वय 24 वर्ष रा-खंडवाणी कॉम्प्लेक्स प्लॉट नं 31 येथे किरायाने स्वामीनारायण मंदीर मागे पो.स्टे.वाठोडा नागपूर असे सांगितले त्यावरून सदर ईसम व गाडीस ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून सदर गाडीबद्दल पो.स्टे.चे अभिलेख तपासले असता सदर गाडीचा पो.स्टे.ला अप.क्र. 255/22 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे दिसून आले. त्याला विश्वासात घेवून कसोसीने विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदर गाडी मी मार्च महिन्याचे आखरी हफ्तामध्ये धारस्कर रोड ईतवारी येथून सकाळी 5ः00 वा दरम्यान चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली. तसेच आरोपीने जानेवारी महिन्यात ओसवाल भवन जवळून ईतवारी भाजीमंडी पो.स्टे.तहसिल नागपूर येथून सकाळी 05 वा दरम्यान एक पांढ-या रंगाची ज्यूपीटर गाडी क्र. एम.एच.49/ एडब्लू -2716 ही चोरी केली त्याच दिवशी ती गाडी ईतवारी रेल्वे स्टेशन मालधक्का चे पार्किंग येथे सोडले तसेच त्याने दहा दिवस अगोदर आमीर हॉटेल टीपरे गल्ली इतवारी जवळुण एक ग्रे रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्र एमएच -31/सी.डब्ल्यू – 2428 ही चोरी केल्याचे त्याचे बयाणात सांगीतले असल्याने नमुद वाहन त्याचे राहते घरून जप्त करण्यात आले. सदर गुन्हयाचा तपास सूरू आहे ..
सदरची कामगिरी अमीतेश कुमार पोलीस आयुक्त , नागपुर शहर,नवीनचंद्र रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग, गजानन राजमाने पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. 3 नागपूर, व संजय सुर्वे साहाय्यक पोलीस आयुक्त कोतवाली विभाग नागपुर शहर यांचे मार्गदर्शानाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवने , दू.पो.नि. विनायक गोल्हे, पोउपनि परशुराम भवाळ, सहा.फौ. प्रमोद शनिवारे, राजेशसिंग ठाकुर, ना.पो.शि. शुभसिंग किरार, पो.कॉ. यशवंत डोंगरे, पंकज बागडे, पंकज निकम, विवेक बोटरे यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.