मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर

नवी‍ दिल्ली :- देशभरातील मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

निवडलेल्या उमेदवारांना विभागाच्या मीडिया आणि सोशल मीडिया कामांमध्ये सहभागी होण्याची संधी देणारा हा अल्प-कालीन इंटर्नशिप कार्यक्रम असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी, मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता या विषयातील बीए / एमए अभ्यासक्रमांमध्ये किंवा एमबीए (मार्केटिंग) (मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारितेत पदवी घेतली आहे) चे शिक्षण घेत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून उपरोक्त अभ्यासक्रमांमध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे ते मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद अटींच्या अधीन पात्र आहेत. इंटर्नशिपचा कालावधी तीन ते सहा महिन्यांचा असेल.

निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 10,000/- रुपये मानधन आणि इंटर्नशिपचे प्रमाणपत्र दिले जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणारे फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि इतर तपशील पुढील लिंकवर पाहू शकतात: https://jalshakti-dowr.gov.in/document/notice-for-internship-of- mass-communication-last-date-15-sep-2023/

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

Fri Aug 18 , 2023
मुंबई :- माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जन्मदिवस, सद्भावना दिन म्हणून देशभर पाळला जातो. यानिमित्त आज मंत्रालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com