संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-नागरिकांनी विविध समस्यांचे दिले निवेदन
कामठी ता प्र 20 :- रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी कामठी रेल्वे स्टेशनची पाहणी करून विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन नागरिकांनी दिलेल्या निवेदनात प्रसंगी व्यक्त केले रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य जय नागवणी यांनी नागपूर उपराजधानीला हाकेच्या अंतरावर लागून असलेल्या कामठी शहरातील रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्मची पाहणी केली त्यादरम्यान काही प्रवासी व नागरिकांनी कामठी रेल्वे स्टेशन वरील विविध समस्या विषयी माहिती दिली कामठी हे देशातील सर्वात मोठे स्थल सेनेचे प्रशिक्षण केंद्र असून देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध राज्यातील तरुण सैनिक प्रशिक्षणासाठी कामठी येथे इंग्रजांच्या काळापासून येत असतात त्यामुळे कामठी रेल्वे स्टेशनला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहेत मुंबई हावडा रेल्वे मार्गावर कामठी हे रेल्वे स्टेशन असून या रेल्वे स्टेशन वर अनेक महत्त्वाच्या रेल्वे एक्सप्रेस गाड्या थांबत नसल्यामुळे सैनिक व इतर नागरिकांना नागपूर रेल्वे स्टेशन ला जाऊन एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास करावा लागत असतो त्यामुळे अनेक नागरिक व सैनिक यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आज कामठी रेल्वे स्टेशन ची पाहापाणी करिता सल्लागार समितीचे सदस्य जय नागवानी आले असता त्यांचा स्वागत सिंधू युवा महासभा कामठी चे सुनील खानवाणी। विमल झामतानी, मनोज बतरा, द्वारकाधीश पारवानी, नरेश पारवानी, मुकेश सहीरामाने आदींनी स्वागत करून विविध समस्यांच्या मागणीचे निवेदन दिले व त्वरित समस्या सोडविण्याची मागणी केली.